दिग्गज गायिका आशा भोसले यांच्याकडून कौतुकाची था...

दिग्गज गायिका आशा भोसले यांच्याकडून कौतुकाची थाप मिळताच भावूक झाली कॉमेडी क्वीन भारती सिंह (Host Bharti Singh went emotional after she received a compliment from the legendary singer Asha Bhosle)

झी टीव्हीचा सा रे ग मा पा हा सर्वात जास्त काळ म्हणजे जवळपास ३ दशके चालणारा गाण्याचा रिॲलिटी शो आहे.  या कार्यक्रमाने सोनू निगम, श्रेया घोषाल, शेखर रविजानी, कुणाल गांजावाला, राजा हसन, वैशाली म्हाडे यांसारख्या काही प्रतिभावान गायकांची ओळख करून दिल्यानंतर, चॅनलने तरुण गायकांना चमकण्याची संधी देण्यासाठी शोच्या नवीन आवृत्तीसह सुरुवात केली आहे.

सा रे ग मा प लिटल चॅम्प्स आता नवव्या सीझनमध्ये आहे आणि प्रेक्षकांना यावेळी न्यायाधीशांचे एक नवीन पॅनल पाहायला मिळणार आहे ज्यात शंकर महादेवन, अनु मलिक आणि नीती मोहन हे स्पर्धकांना गायनाचे  मार्गदर्शन करताना दिसणार आहेत आणि भारती सिंग ही या कार्यक्रमाची मनोरंजक होस्ट  आहे.  आणि या आठवड्यात सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले या शोमध्ये सामील होणार आहेत.

झी टीव्हीच्या ‘सा रे ग मा पा’ या गाण्याच्या रिॲलिटी शोमध्ये, जिथे टॉप 13 स्पर्धक त्यांच्या मंत्रमुग्ध आवाजाने आणि आकर्षक गाण्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध करत आहेत. त्याचवेळी, या वीकेंडला दिग्गज गायिका आशा भोसले या शोमध्ये विशेष पाहुण्या म्हणून सामील झाल्या होत्या. यावेळी आशा भोसले यांनी प्रत्येक स्पर्धकाचे त्यांच्या खास शैलीत कौतुक केले आणि त्यांना बक्षीस दिले. तसेच त्यांनी शोची होस्ट भारती सिंगची प्रशंसा केली.

‘सारेगामापा’ या सिंगिंग रिॲलिटी शोच्या सेटव, इंडस्ट्रीतील दिग्गज गायिकेच्या तोंडून स्वतःची  स्तुती ऐकून भारती सिंग भावूक झाली अन्‌ तिच्या डोळ्यात पाणी आले. आशा भोसले कॉमेडी क्वीन भारती सिंगचे कौतुक करताना म्हणाल्या की, “मी तुमची मोठी फॅन आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा कारण मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही खोटे बोलले नाही. मी सुरुवातीपासूनच तुमचे काम आणि तुमची प्रतिभा पाहिली आहे. तुम्ही ज्या प्रकारे स्वतःला सांभाळता आणि ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या संपूर्ण प्रवासात स्वतःला हाताळले आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे.”

भारतीला प्रोत्साहन देताना आशा भोसले म्हणाल्या, “जेव्हाही मी तुला कोणत्याही शोमध्ये पाहिलं, तेव्हा तुझ्या विनोदांवर हसले आहे. तू खूप छान व्यक्ती आहेस. इतकेच नाही तर आशा भोसले यांनी भारतीच्या कामाचे कौतुक केल्यानंतर सेटवरील जजेस आणि ज्युरी सदस्यांसह सर्वांनी तिला स्टँडिंग ओव्हेशन दिले. खरोखर भारती सिंगसाठी हा क्षण अविस्मरणीय असाच होता.