रबने बना दी जोडी…! कतरिना आणि विकीचे ३६ पैकी जु...

रबने बना दी जोडी…! कतरिना आणि विकीचे ३६ पैकी जुळतात ३२ गुण! (Horoscope Predictions : Katrina–Vicky Made For Each Other)

गेल्या महिनाभरापासून सातत्यानं चर्चेत असलेलं अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचं लग्न अखेर पार पडत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून विकी-कतरिनाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु होती. आज दोघांच्या डोक्यावर अक्षता पडणार. राजस्थानमधील एका किल्ल्यावर शाही थाटात ते दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत.

कतरिना, विकी, Horoscope Predictions, Katrina, Vicky

विकी-कतरिनाचा संपूर्ण विवाहसोहळा हिंदू रिती रिवाजांनुसार होणार आहे. हिंदू धर्मात विवाहापूर्वी वधू वराचे गुण मिलनाची पूर्वीपासून प्रचलित असलेली पद्धत अजूनही सुरु आहे. या निमित्ताने अनेक ज्योतिषांनी विकी आणि कतरिनाचेही किती गुण जुळले असतील? याचा अंदाज लावला आहे.

कतरिना, विकी, Horoscope Predictions, Katrina, Vicky
कतरिना, विकी, Horoscope Predictions, Katrina, Vicky

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कतरिनाची लग्न रास ही धनू आहे. तिच्या पत्रिकेत चंद्र हा शनीसोबत कुंभ राशीत स्थित आहे. तर दुसरीकडे विकीच्या जन्मपत्रिकेनुसार चंद्र हा वृषभ राशीसह सूर्य आणि बुध यांच्यात स्थित आहे. या दोघांचीही पत्रिका लग्नासाठी उत्तम मानली जात आहे. कतरिना आणि विकी कौशलचे ३६ पैकी ३२ गुण जुळत आहेत. त्यामुळे हे लग्न शुभ मानले जात आहे. लग्नानंतर कतरिना आणि विकी कौशल यांचे वैवाहिक जीवन फार चांगले असणार आहे, असे ज्योतिषांचे म्हणणे आहे.

कतरिना, विकी, Horoscope Predictions, Katrina, Vicky

विकी-कतरिनाचा विवाह राजस्थानमधील सवाई माधोपूर या ठिकाणच्या सिक्स सेन्सेस राजमहालात आयोजित करण्यात आला आहे. ई टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सिक्स सेन्सेस या राजमहालाच्या आवारात एक अतिशय भव्य मंडप तयार करण्यात आला आहे. याच मंडपात लग्नाचे सर्व विधी पार पडणार आहेत.

कतरिना, विकी, Horoscope Predictions, Katrina, Vicky

तसेच नववधू आणि वराच्या एंट्रीसाठी रथ आणि घोडाही तयार करण्यात आला आहे. कतरिना कैफ ही पारंपारिक डोलीमध्ये बसून मंडपात एंट्री घेणार आहे. तर विकी कौशल हा घोड्यावर बसून मंडपात प्रवेश करणार आहे. संध्याकाळी साधारण ६ च्या दरम्यान विकी-कतरिना सप्तपदी घेतील. या लग्नासाठी उभारण्यात आलेला मंडप राजवाडा शैलीत बांधण्यात आला आहे. तो अतिशय आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला आहे. दरम्यान विकी आणि कतरिनाचा मेहंदी सोहळा, संगीत सोहळा व्यवस्थित साग्रसंगीत पार पडले असून. आज त्यांचा विवाहसोहळा देखील अलिशान आणि भव्यदिव्य पद्धतीने पार पडेल यात शंका नाही.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम