राशी भविष्य: एप्रिल 2021 – निल नंदा (Horo...

राशी भविष्य: एप्रिल 2021 – निल नंदा (Horoscope Of April 2021)

मेष

स्पर्धात्मक महिना असेल. कार्याला गती प्राप्त होईल. पैसा व प्रकृती स्वास्थ्य
लाभेल. कुटुंबात सामंजस्य आवश्यक. संयमी भूमिका घेतल्यास महिना विशेष
फलदायी ठरेल.

वृषभ

आर्थिक लाभाचा महिना असेल. मोठ्यांचे मार्गदर्शन प्राप्त होईल. व्यवसाय,
नोकरीमध्ये स्पर्धा अधिक तीव्र होईल. भाग्योदय होण्यासाठी गुणवत्ता वाढवावी लागेल. महत्त्वाकांक्षा वृद्धींगत करताना गाफील राहू नये. अति क्रोध प्रकृतीस्वास्थ्यास हानिकारक ठरेल. एकूण महिना संयमी.

मिथुन

ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. सुरुवातीच्या काळात वाचवलेले धन उत्तरार्धात खर्च केले जाईल. मित्रांमुळे शत्रुत्व निर्माण होईल. मनमानी करताना क्रोध आवरावा लागेल. नोकरी-व्यवसायासाठी भ्रमंती घडेल. महिना स्थिरदायक.

कर्क

प्रगतीदायक व उत्कर्षाचा महिना असेल. स्थावर जंगम मालमत्ता वृद्धिंगत होईल. नोकरी व्यवसायाकडे दुर्लक्ष करू नये. प्रकृतीस्वास्थ्य जपावे. क्रोधावर नियंत्रण आवश्यक. विचारपूर्वक गुंतवणूक करावी. एकूण महिना अस्थिर.

सिंह

आर्थिक कुचंबणा जाणवणारा महिना. प्रकृतीस्वास्थ्य सांभाळावे. प्रवास घडेल. त्यातून व्यवसायात मोठी गुंतवणूक कराल. आर्थिक सुबत्ता येईल परंतु प्रचंड धावपळीचा महिना असेल.

कन्या

प्रवासातून विशेष लाभ उद्भवतो. विद्यार्थ्यांसाठी शुभदायक महिना आहे. महिलांनी वादाचे विषय टाळावेत. जमिनीपासून आर्थिक फायदा उपलब्ध होईल. नोकरी व्यवसायात स्थिरता प्राप्त होईल. एकूण महिना शुभदायक.

तूळ

उच्च शिक्षणासाठी परदेशगमन संभवते. जमिनीतून लाभ. नोकरी व्यवसायात प्रगती. महिलांसाठी भावनिक त्रासाचा महिना असेल. प्रकृतीस्वास्थ्य जपावे. आर्थिक मालमत्तेवर लक्ष ठेवावे. एकूण महिना त्रासदायक.

वृश्‍चिक

अल्पावधीत यशप्राप्तीकडे नेणारा मार्ग तुम्हाला हानिकारक ठरेल. कलागुणांना वाव मिळेल. बुद्धिमत्तेच्या जोरावर यश प्राप्त कराल. विद्यार्थ्यांना स्थिरता प्राप्त होईल. महिलांना कौटुंबिक आनंदाची बातमी समजेल. महिना शुभदायक आणि यशदायक.

धनू

स्थावर जंगम मालमत्तेमध्ये लाभ. कौटुंबिक अडचणी येतील. विविध थकबाकी वसूल होण्याची शक्यता आहे. व्यवसायात मनाजोगता लाभ संभवत नाही. भाऊबंदकी जाणवेल. महिना चिंताजनक तरीही उत्तरार्धात गुरूची साथ लाभल्यास यशदायक.

मकर

कार्य यशस्वी करण्याचा महिना. उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रयत्नशील राहा. विविध पुरस्कारांनी सन्मानित व्हाल. महिलांसाठी तसेच पुरुषांसाठीही त्रासदायक. प्रकृतीकडे लक्ष द्यावे. प्रकृतीसाठी चिंताजनक परंतु आर्थिक आणि सामाजिक यश वृद्धिंगत करणारा महिना.

कुंभ

आर्थिक आवक अत्यंत कमी. भावनिक पातळीवर कुचंबणा जाणवेल. पोटाच्या तक्रारी जाणवतील. व्यवसायात कोणाचाही अहंकार दुखावू नका. नोकरीमध्ये अस्थिरता जाणवते. एकूण महिना अस्थिर.

मीन

चैतन्यपूर्ण महिना. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना यश मिळेल. भाऊबंदकीपासून लांब राहा. प्रकृतीकडे लक्ष द्या. जोडीदारावर राग काढू नका. नोकरीमध्ये बढती प्राप्तीची शक्यता. एकूण महिना आशादायी.

शुभ मुहूर्त
विवाह मुहूर्त 22, 24, 25, 26, 28, 29, 30 – उपनयन मुहूर्त 22, 23, 29 – वास्तु भूमिपूजन मुहूर्त नाहीत.

दिन विशेष
शुक्रवार 2 एप्रिल गुड फ्रायडे, बुधवार 7 एप्रिल पापमोचनी एकादशी,
शुक्रवार 9 एप्रिल प्रदोष, सोमवार 12 एप्रिल सोमवती अमावस्या, मंगळवार 13 एप्रिल गुढीपाडवा, बुधवार 14 एप्रिल श्री स्वामी समर्थ प्रगट दिन,
शनिवार 17 एप्रिल लक्ष्मी पंचमी, सोमवार 19 एप्रिल एकवीरादेवी पालखी,
बुधवार 21 एप्रिल राम नवमी, रविवार 25 एप्रिल महावीर जयंती, मंगळवार 27 एप्रिल हनुमान जयंती, शक्रवार 30 एप्रिल संकष्ट चतुर्थी