राशी भविष्य – मार्च 2021 (Horoscope March...

राशी भविष्य – मार्च 2021 (Horoscope March 2021)

मेष: या मासात मित्रवर्ग आपल्यावरती खुश असेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. पुरस्कार प्राप्त होतील. परंतु, आर्थिक गुंतवणूक करताना धाडस करू नका. कौटुंबिक स्वास्थ्य जपण्यासाठी खर्च होईल. मेषेच्या व्यक्तींना हा महिना शुभदायक आहे.

वृषभ: व्यवसायात खरेदी-विक्री आवक वृद्धिंगत होईल. नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात अपेक्षित यश प्राप्ती होईल. विद्यार्थ्यांसाठी परदेशगमन शुभदायक. कायद्याच्या चौकटीत राहून कार्य करा. महिना लाभदायक आहे.

मिथुन: कार्यप्रणाली वृद्धिंगत होईल. समाजकार्यात सहभाग घ्याल. नोकरीमध्ये सतर्कता आवश्यक. प्रकृतीच्या तक्रारींकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. क्रोधावर नियंत्रण आवश्यक. खर्चावरती प्रतिबंध आवश्यक. एकूण महिना स्थिरदायक असेल.

कर्क: आर्थिक कोंडीचा महिना. कौटुंबिक कामासाठी प्रवास घडेल. मित्रांकडून अपयश. स्थावर व जंगम मालमत्तेची कामे होतील. शैक्षणिक प्रगती लाभेल. उत्पन्नावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक. एकूण महिना दिलासादायक असेल.

सिंह: अहंपणामुळे गैरसमज उद्भवतात. व्यापारात, व्यवसायात मंदी जाणवेल. नोकरीमध्ये मोठ्या हालचाली करू नयेत. महिन्याच्या उत्तरार्धात धनलाभ संभवतो. एकूण महिना आशादायक आणि संयमीपणा दाखविल्यास उत्तम आहे.

कन्या: व्यवसायात वृद्धी संभवते. स्थावर जंगम मालमत्तेसाठी महिना प्रतिकूल. आर्थिक स्थैर्य अधिक प्रबळ होईल. दूरचे प्रवास संभवतात. एकूण महिना शुभदायक आहे.

तूळ: कायदेशीर व्यवहारात मित्रांचा सल्ला घेऊ नये. शेवटचा सप्ताह अधिक शुभदायक असेल. सहज संधी प्राप्त होतील परंतु, कोणत्याही कार्यात जोखीम घेऊ नये. कलागुणांना वाव मिळेल. कृती करताना संयम आवश्यक. एकूण महिना स्थिरता प्रदान करणारा असेल.

वृश्‍चिक: कौटुंबिक काळजी वाढविणारा महिना आहे. मानसिक आणि आर्थिक स्तरावर अस्थैर्य जाणवेल. कौटुंबिक गुंता सोडविताना संयम बाळगणे आवश्यक. क्रोधावर नियंत्रण आवश्यक. कलागुणांना वाव मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना शुभदायक.

धनू: आखलेल्या नवीन योजनांना कृतीमध्ये आणाल. कौटुंबिक स्वास्थ्य अस्थिर राहील. आर्थिक लाभ होतील. व्यवसायात मोठी उलाढाल कराल. विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त होण्यास सुरुवात होईल. संपूर्ण महिना उत्तम जाईल.

मकर: आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. आशावादी राहिलात तरच शेवटपर्यंत आर्थिक स्थैर्य प्राप्त कराल. महिलांसाठी महिना उत्तम तर विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल आणि पुरुषांसाठी अनुकूल असणार आहे. व्यवसायवृद्धी करताना संयम आवश्यक.

कुंभ: चैतन्य प्रदान करणारा महिना आहे. आर्थिक उलाढाली संयमित असल्या तरीही स्थावर-जंगम मालमत्तेमध्ये गुंतवणूक होऊ शकते. प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष देणे आवश्यक. मोठे खर्च उद्भवतील. स्वतःवर संयम आवश्यक. एकूण महिना खर्चिक आहे.

मीन: व्यवसाय, नोकरीमध्ये स्पर्धात्मक संघर्ष जाणवेल. आपत्कालीन खर्च उद्भवतात. कलागुणांचा आदर केला जाईल. महिलांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी हा महिना उत्तम. एकूण महिना शुभदायक असेल.

शुभ मुहूर्त: या महिन्यात शुक्र असल्यामुळे विवाह, उपनयन, वास्तू व भूमिपूजन मुहूर्त उपलब्ध नाहीत. साखरपुडा मुहूर्त दिनांक 2, 3, 5, 7, 9, 10, 15, 25.

दिन विशेष: सोमवार – 1 मार्च भैरवनाथ यात्रा, मंगळवार – 2 मार्च अंगारक संकष्ट चतुर्थी, बुधवार – 3 मार्च श्रीकृष्ण सरस्वती जयंती, शुक्रवार – 5 मार्च गजानन महाराज प्रकट दिन, मंगळवार – 9 मार्च रामदास नवमी, गुरुवार – 11 मार्च विजया एकादशी, सोमवार – 15 मार्च महाशिवरात्र, गुरुवार – 18 मार्च श्री रामकृष्ण परमहंस जयंती, गुरुवार – 25 मार्च याज्ञवल्क्य जयंती, रविवार – 28 मार्च आमलकी एकादशी, सोमवार – 29 मार्च हुताशनी पौर्णिमा, मंगळवार – 30 मार्च धुलीवंदन
– निल नंदा