फेब्रुवारी 2021 – राशी भविष्य (Horoscope...

फेब्रुवारी 2021 – राशी भविष्य (Horoscope February 2021)

मेष
फेब्रुवारी मास प्रगतीकारक, यशदायक तथा लाभकारक राहील. दिनांक 21 नंतर कौटुंबिक समस्या उद्भवतील. आर्थिक लाभाचे व्यवहार होतील तथा जोखमीची कामे करताना काळजी घ्यावी.

वृषभ
विद्यार्थ्यांना यशदायक तर सामान्यांना कौटुंबिक सुखदायक मास आहे. समाजातील पत वाढेल. नोकरीमध्ये गाफील राहू नका. विवाह इच्छुकांचे विवाह जुळण्यास योग आहेत.

मिथुन
शारीरिक तक्रारीयुक्त मास असून कौटुंबिक कलह वृद्धिंगत होईल. उत्तरार्धात लाभाची शक्यता. मिथुन राशीसाठी सदर मास खर्च देणारा असेल.

कर्क
भावनिक आणि शारीरिक अस्वस्थता जाणवेल. नोकरी-व्यवसायात परदेशगमन दर्शविते. कार्यात यशप्राप्ती होईल. काही प्रमाणात शारीरिक व्याधी उद्भवू शकतात.

सिंह
आपत्कालीन स्थिती उद्भवू शकते. तथा त्यातून योग्य मार्ग निघू शकतो. पर्यटनावर खर्च उद्भवेल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळण्यास उत्तम महिना.

कन्या
मानसिक अस्वस्थता जाणवेल. स्थावर जंगम मालमत्ता वृद्धिंगत होईल. परदेशगमन शक्यता. संततीकडून आनंदी वार्ता समजेल.

तूळ
गृहसौख्ययुक्त मास. महिनाअखेरीस मोठ्या प्रमाणावर पैशाची चणचण उद्भवेल. कमीत कमी प्रसंगी वरिष्ठांशी वाद टाळावेत. घरात एकोपा कायम ठेवावा.

वृश्‍चिक
महिन्याच्या सुरुवातीला शक्य तेवढी महत्त्वाची कामे मार्गी लावावीत. शेवटच्या आठ दिवसांमध्ये महत्त्वाचे कोणतेही कार्य हातात घेऊ नये. भावनिक क्लेश उद्भवतील. विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ.

धनू
या मासात आपल्याला दुप्पट यश प्राप्ती होईल. साडेसातीमुळे विलंब जरी होत असेल तरीही आर्थिक लाभ होत राहतील. कोर्टाची कामे या महिन्यात करावीत. महिलांसाठी सुवर्णकाळ.

मकर
नोकरी-व्यवसायात प्रगती तर प्रकृतीस्वास्थ्य खराब असेल. हा महिना प्रचंड खर्चाचा आहे. त्यामुळे खर्च जपून करावा. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कुंभ
स्पर्धात्मक संघर्ष जाणवेल. पोटाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये. कायदेशीर प्रश्नांमध्ये तालुक्याने निर्णय घ्यावा. ग्रहमान प्रतिकूल.

मीन
ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल. अचानक कौटुंबिक तथा आर्थिक लाभ होईल. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. महिलांसाठी सदर मास खर्चिक आहे.

शुभ मुहूर्त
विवाह मुहूर्त – दिनांक 15, 16 जावळ मुहूर्त – दिनांक 3, 4, 12, 22
भूमिपूजन मुहूर्त फेब्रुवारी महिन्यात नाहीत.

दिन विशेष
गुरुवार – 4 कालाष्टमी, रविवार – 7 स्मार्त एकादशी, सोमवार – 8 भागवत एकादशी, गुरुवार – 11 मौनी अमावस्या, सोमवार – 15 गणेश जन्मदिन, मंगळवार – 16 वसंत पंचमी, गुरुवार – 18 वसंत ऋतु प्रारंभ, शनिवार – 20 दुर्गाष्टमी, मंगळवार – 23 जया एकादशी, बुधवार – 24 गोंदवलेकर महाराज जयंती, गुरुवार – 25 विेशकर्मा जयंती, शनिवार – 27 पौर्णिमा
-निल नंदा