पालीला घराबाहेर काढण्याचे ११ सोपे घरगुती उपाय (...

पालीला घराबाहेर काढण्याचे ११ सोपे घरगुती उपाय (11 Easy And Effective Home Remedies to Get Rid of Lizards)

घरात आढळून येणाऱ्या कीटकांपैकी बहुतांशी महिला, मुलं आणि काही प्रमाणात पुरुष देखील पाल आणि झुरळ यांना जास्त घाबरतात. पालीची भिती म्हणण्यापेक्षा किळस वाटते. पाल घरात आली की ती घराबाहेर जाईपर्यंत आपण काही स्वस्थ बसत नाही. या पालींना घराबाहेर काढण्याचे काही घरगुती अन्‌ सोपे उपाय आपण पाहूया.

 • पेपर स्प्रे
  पालीला पळवून लावण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे पेपर स्प्रे. काळी मिरीची पावडर थोड्या पाण्यात मिसळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवून द्या. कुठेही पाल दिसल्यास तिच्यावर हा स्प्रे मारा. पालीला काळ्या मिरीची अलर्जी असून ती त्यापासून दूरच राहते. एवढंच नाही तर जेथे हा स्प्रे मारला असेल त्याठिकाणी ती पुन्हा येत नाही. पेपर स्प्रे घरी बनवायचा नसेल तर बाजारात तो सहज उपलब्ध होतो.
 • चिली फ्लेक्स आणि चिली पावडर
  टॉबेस्को सॉस, चिली फ्लेक्स आणि लाल मिरची पावडर इत्यादी पालीला बाहेर काढण्यासाठी अधिक प्रभावशाली आहे.
 • कांदा आणि लसूण
  कांदा लसणाच्या वासानेही पाल टॉर्चर होते. म्हणून घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांत लसूण आणि कांदा ठेवा. किंवा खोलीमधील खिडक्या आणि दरवाज्यांवर लसूण बांधून टांगती ठेवा. यामुळे पाल घरात येणार नाही. असं करायचं नसल्यास तुम्ही त्याचा स्प्रे बनवून बाटलीमध्ये ठेवून पाल दिसल्यास तिच्यावर मारू शकता.
 • मोराचं पिस ठेवा
  मोराचं पिस पाहून पाल पळून जाते. भिंतीवर ५-६ मोराची पिसे लावून ठेवा. काहीजण देव्हाऱ्याच्या बाजूस वा वर मोराची पिसे आणून ठेवतात.
 • तंबाखू आणि कॉफी पावडर
  तंबाखू आणि कॉफी पावडर एकत्र करून त्याचे बॉल्स बनवून घ्या. हे बॉल्स घराच्या कानाकोपऱ्यात किंवा जेथे जेथे पाल येते त्या ठिकाणी टाकून ठेवा. हे बॉल्स खाल्ल्यानंतर पाल एकतर मरते किंवा मग पळून जाते.
 • नॅफथलीनच्या गोळ्या
  घरामध्ये लहान मुलं नसतील तर पालीला घराबाहेर काढण्यासाठी नॅफथलीनच्या गोळ्यांचा वापर करता येतो. या गोळ्या वॉर्डरोब, पाण्याचं सिंक, दरवाजे आणि खिडक्यांजवळ ठेवा. पालींना पळवून लावण्याचा हा अतिशय सोपा उपाय आहे. या गोळ्यांचा गंध तुमच्यासाठी जरी सामान्य असला तरी पालीला हा अजिबात आवडत नाही.

अंड्याचं कवच
अंड फोडल्यानंतर त्याचं कवच कचऱ्यात न फेकता त्याचा वापर पालीला घराबाहेर काढण्यासाठी करता येतो. हे अंड्याचं कवच घरात जरा उंचावर ठेवा. अंड्याच्या वासाने पाल पळते. अंड्याचं कवच वापरताना ते नीट पुसून घ्या. पण ते धुऊ नका नाहीतर त्याचा स्ट्राँग गंध निघून जाईल, ज्या गंधाने पाल पळते.

 • आइस कोल्ड वॉटर
  पाल ही थंड पाण्याला घाबरते. तेव्हा पाल दिसताच तिच्यावर थंड बर्फाच्या पाण्याचा स्प्रे मारा. थंड पाण्याने ती गळून पडते आणि मग आपण तिला उचलून बाहेर फेकू शकतो.
 • फिनाइलच्या गोळ्या
  घरामध्ये जेथून जेथून पाल येण्याची शक्यता असते, त्या त्या ठिकाणी फिनाइलच्या गोळ्या टाकून ठेवा. म्हणजे पाल तुमच्या घरापासून दूरच राहील.
 • सिंकचा भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवा
  दमट जागेवर पाल जास्त प्रमाणात येते. तेव्हा सिंकच्या खाली जो कॅबिनेट एरिया असतो, त्याठिकाणी अधिक धोका आहे. म्हणूनच हा भाग नेहमी सुका आणि स्वच्छ ठेवा. तेथील एखादा पाईप वगैरे लिक असेल तर लगेचच दुरुस्त करून घ्यावा. मग आपोआप पाल घराबाहेर जाईल.