पचनासंबंधीच्या समस्या (Home Remedies For Easy D...

पचनासंबंधीच्या समस्या (Home Remedies For Easy Digestion)

आपण जे अन्न सेवन करतो, ते व्यवस्थित पचलं तर आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो. नाहीतर आपल्याला पचनासंबंधीच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. या समस्या कोणत्या आणि त्यावर उपाय म्हणून घरच्या घरी आपण काय करू शकतो, ते पाहूया.

अ‍ॅसिडिटी
– एक कप पाण्यामध्ये 3 वेलचींची पावडर घालून उकळवा आणि थंड झाल्यावर प्या.
– चार-पाच तुळशीची पानं किंवा बडीशेप चावून खा.
– एक लवंग आणि एक वेलची जाडसर कुटून त्याची वाफ घ्या.
– पिकलेलं केळं खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी दूर होते.
– एक टीस्पून मेथीच्या दाण्याची पाणी घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट ताकात मिसळून प्या.
– एक टीस्पून जिरे पावडर पाण्यातून घेतल्यास अ‍ॅसिडिटी बरी होते.
– एक कप पाण्यामध्ये तुळशीची पानं घालून पाच मिनिटं उकळवा. नंतर ते पाणी गाळून घेऊन त्यात अर्धा चमचा मध घालून प्या.

उलटी
– एक ते दोन लवंगा तोंडात ठेवून चुपा.
– एक कप पाण्यामध्ये चार-पाच लवंगा घालून ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा आणि मग प्या.
– तीन-चार तळलेल्या लवंगा मधामध्ये बुडवून चुपा.
– प्रत्येकी 1 टीस्पून पुदिन्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करा. त्यात 1टेबलस्पून मध मिसळा आणि दिवसातून तीन वेळा घ्या.
– एक कप पाण्यामध्ये 1 टीस्पून दालचिनी पावडर घालून पाणी अर्धा कप होईपर्यंत उकळवा. पाणी गाळून प्या.
– एक टीस्पून आल्याचा रस आणि एक टीस्पून लिंबाचा रस एकत्र करून दिवसातून 2-3 वेळा घेतल्यास उलटीच्या त्रासापासून आराम मिळतो.

बद्धकोष्ठता
– अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा टीस्पून परतवून घेतलेली जिरा पावडर घालून रोज प्या. बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही.
– रोज सकाळी व संध्याकाळी एक ग्लास पाण्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस, चिमूटभर मीठ आणि 1 टीस्पून मध मिसळून प्या.
– प्रत्येकी 2-2 बदाम आणि अंजीर चार ते पाच तास पाण्यात भिजवून ठेवा. नंतर मिक्सरमधे वाटून त्याची पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये 1 टेबलस्पून मध घालून रोज रात्री घ्या.
– एक ग्लास पाण्यामध्ये 1 टेबलस्पून आळशीचं बी घालून तीन-चार तास भिजवून ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी प्या.
– कोबीची रस दिवसातून दोन वेळा घेतल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.
– दिवसातून दोन वेळा 1 टीस्पून त्रिफळा चूर्ण आणि 1 टीस्पून मध एकत्र करून घेतल्यास बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून आराम मिळतो.
– सूर्यफुलाचं बी आणि तीळ समान मात्रेत घेऊन एकत्र वाटून घ्या. आठवड्यातून एक वेळ पाण्यातून घ्या. फांक
– अर्धा ग्लास पालकच्या रसामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून प्या. असे तीन दिवस नेमाने केल्यास बद्धकोष्ठता दूर होते.
– अर्धा ग्लास पालकच्या रसामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून प्या. असे तीन दिवस नेमाने केल्यास बद्धकोष्ठता दूर होते.

पोटदुखी, अपचन
-एक ग्लास गरम पाण्यामध्ये चिमूटभर हिंग आणि चिमूटभर काळं मीठ घालून दिवसातून दोन-तीन वेळा प्या.
– पोट दुखत असल्यास पुदिन्याची पानं चघळा, लगेच आराम मिळेल.
– एक ग्लास गरम पाण्यामध्ये एका लिंबाचा रस, 1 टीस्पून बेकिंग सोडा आणि चिमूटभर काळं मीठघालून लगेचच प्या.
– एक कप पाण्यामध्ये पुदिन्याची थोडी पानं 3-4 मिनिटं उकळवा. ते पाणी गाळून त्यात मध घालून प्या. असे दिवसातून दोन -तीन वेळा तरी करा.
– भाताच्या पेजेचं पाणी प्याल्यानेही पोटात दुखणं कमी होतं. आपण या पाण्यामध्ये आवडीनुसार मध घालूनही घेऊ शकतो.
– एक कप गरम पाण्यामध्ये प्रत्येकी 1टीस्पून अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि मध घालून प्या.
– अर्धा ग्लास गरम पाण्यामध्ये 1 टीस्पून ओवा, चिमूटभर काळं मीठ आणि तीन-चार थेंब लिंबाचा रस घालून प्या. लगेच आराम मिळतो.
– प्रत्येकी अर्धा टीस्पून लिंबाचा आणि पुदिन्याचा रस, त्यात दोन-तीन थेंब आल्याचा रस आणि चिमूटभर काळं मीठ घालून हे मिश्रण प्याल्याने पोटदुखी बरी होते.
– अपचन झाल्यास प्रत्येकी अर्धा टीस्पून जिरं आणि बडीशेप चावून खा. नाहीतर दोघांची पावडर करूनही खाता येतं.

डायरिया
– पातळ जुलाब होत असतील तर पिकलेलं केळं खा. आवडत असल्यास पिकलेल्या केळ्यामध्ये दही घालून खाल्लं तरी चालेल. केळं कच्चं असल्यास पचनाचा त्रास होऊ शकतो, हे लक्षात ठेवा.
– आल्याचा एक छोटा तुकडा किसून घ्या आणि 1 टीस्पून मध घालून त्याचं सेवन करा.
– दिवसातून दोन वेळा एक ग्लास पाण्यामध्ये एक टीस्पून अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिसळून प्याल्यास जुलाबात आराम मिळतो.
– जुलाब होत असतील तर हर्बल टी, जिंजर टी, ग्रीन टी आणि कॅमोमाइल टीचे सेवन करा.
– दोन टेबलस्पून दह्यामध्ये अर्धा-अर्धा टीस्पून मेथीदाणे आणि जिरं घालून खा. दिवसातून तीन वेळा असं केल्यास लगेच जुलाब बंद होण्यास मदत होईल.