रत्नागिरीच्या लक्ष्मी ढाकणे यांनी पटकावली ११ ला...

रत्नागिरीच्या लक्ष्मी ढाकणे यांनी पटकावली ११ लाखांची महापैठणी (Home Maker Contestant From Ratnagiri Wins Mahapaithani Worth 11 Lakh Rupees)

घरातील गृहीणींचा सन्मान या उद्देशाने सुरु झालेला झी मराठी वरील होम मिनिस्टर हा कार्यक्रम गेली १८ वर्षे सुरु आहे. इतके वर्षे होऊनही या मालिकेची लोकप्रियता तीळमात्र ही कमी झालेली नाही. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारताबाहेर देखील या मालिकेचे चाहते आहेत. या मालिकेचे नवनवीन पर्व प्रेक्षकांना नेहमीच आवडतात. असंच एक महामिनिस्टर हे पर्व नुकतचं संपलं. या पर्वात देशातील वेगवेगळ्या महिलांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या स्पर्धेत विजेती होणाऱ्या स्पर्धकाला तब्बल ११ लाखांची पैठणी मिळणार होती.

या महापैठणीसाठी महाराष्ट्रातील ११ शहरांमधील महिला सहभागी झाल्या होत्या. या ११ शहरातील महिलांमधून प्रत्येकी एक अशी स्पर्धक महाअंतिम सोहळ्यासाठी निवडली गेली. त्या प्रत्येकीचा १ लाख रुपयांच्या पैठणीने सन्मान करण्यात आला.

रविवारी २६ जूनला हा महासोहळा झी मराठीवर दाखवण्यात आला. त्यामध्ये रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे यांनी ११ लाखांची महापैठणी पटकावली. या पैठणीला सोन्याची जर आहे तसेच ती हिरे जडीत आहे. हे पर्व काल संपले. आता २७ जून पासून होम मिनिस्टर या मालिकेचं ‘’खेळ सख्यांचा चारचौघींचा’’ हे नवं पर्व सुरु होत आहे.