चेहर्‍यावर सुरकुत्या, घरगुती उपाय काय? (Home Ma...

चेहर्‍यावर सुरकुत्या, घरगुती उपाय काय? (Home Made Remedies To Treat Wrinkles On Face)

मी 28 वर्षांची असून माझ्या ओठांवर भरपूर लव आहे. मला वॅक्स किंवा थ्रेडिंग करायला भिती वाटते. ओठांवरील लव कमी करण्यासाठी मी काय करू?

 • बेला म्हात्रे, बोईसर
  इतर कोणत्याही वॅक्सऐवजी कटोरी वॅक्स वापरून बघा. किंवा ब्लिच करू शकता. घरीच उपाय करायचा असेल तर हळद, दही व बदाम पावडर एकत्र करून पेस्ट बनवा. याचा लेप 20 मिनिटे ओठांवर लावा. मी 30 वर्षांची आहे. कामाच्या दगदगीत स्वतःकडे लक्ष दिले नाही. आत्तापासूनच
 • चेहर्‍यावर सुरकुत्या दिसताहेत. कृपया घरगुती उपाय सांगा.
 • रश्मी काकडे, पनवेल
  सर्व प्रथम आरशासमोर उभी राहून सकाळी हसा. कोल्ड क्रीम, व्हिटॅमिन इ क्रीमने हलका मसाज करा. आंघोळीनंतर मॉश्चरायजर लावा, आठवड्यातून दोन वेळा चंदन फेस पॅक लावा जो कोरड्या त्वचेसाठी असतो. तो पॅक 20 मिनीटे त्वचेवर ठेवून मग धुऊन टाकावा. संपूर्ण चेहर्‍याच्या सुरकुत्या जाऊन चेहरा तजेलदार होईल. आहारात दुध, ज्यूस, सूप, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, मासे, अंडी, आवळा खावा व 7 ते 8 ग्लास पाणी प्यावे.
 • माझ्या मुलीला व मला डोक्यावर तेल घालायला अजिबात आवडत नाही. दोघींचे केस खूप गळले. अजूनही रोज गळतात. काय करू?
 • स्मिता वाळवे, रत्नागिरी

तेल आवडत नसेल तर कोरफड किंवा जास्वंद जेल मध्ये थोडं पाणी मिसळा व फ्लॅट ब्रशने केसांच्या मुळांना लावा. 1 तास ठेवून फक्त पाण्याने धुवून टाका. मुळांना लावून उरलेले जेल केसांना लावा. आवळा सुपारी दर 3 तासांनी एक छोटा तुकडा खात जा, त्याची जी लाळ पोटात जाईल ती गुणकारी असते. 7 ते 8 ग्लास पाणी प्या.

मी 6 महिन्यांपूर्वी रीबाँडींग केले होते. पण आता माझे केस मुळापासून जास्त झडू लागलेत. ते पुन्हा यावेत म्हणून मी काय करू ?

 • रोहिणी शिंदे, कोल्हापूर
  रीबाँडींग करताना केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरले जातात. म्हणून रीबाँडींग केल्यानंतर केसांची निगा राखणे आवश्यक असते. केसांना प्रोटीन पॅक लावून 20 मिनिटांनी धुवा. नंतर अर्धा कप पाण्यात स्मूदनींग शॅम्पू घालून त्या पाण्याने धुवा. पाणी पूर्ण निथळून गेल्यावर, फक्त केसानाच चमचाभर कंडिशनर लावा. 5 मिनिटांनी धुऊन घ्या. जेवणात प्रथिनयुक्त आहार घ्या. नियमित मोड आलेल्या कडधान्याच्या उसळी खा. त्यात खूप शक्ती असते. ती केसांची मुळे मजबूत करते.