सृष्टी रोडेने शेअर केले बॅंकोकच्या सहलीचे फोटो,...

सृष्टी रोडेने शेअर केले बॅंकोकच्या सहलीचे फोटो, चाहत्यांनी राजकुमारी अशी कमेंट करत केले कौतुक (Holiday Vibes: Srishty Rode’s Stunning Pictures From Bangkok Holiday Will Give You Travel Goals)

बिग बॉस फेम सृष्टी रोडे सध्या टीव्ही शोमध्ये जास्त दिसत नसली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. सृष्टी सध्या बँकॉकमध्ये सहलीचा आनंद घेत आहे. तिथून ती आपल्या चाहत्यांसाठी सुंदर फोटो शेअर करत आहे.

सृष्टीचे सर्व फोटो अतिशय सुंदर आहेत. विशेष म्हणजे तिने कोणतेही बिकिनी फोटो पोस्ट केलेले नाहीत.  अभिनेत्रीचे नवीन फोटो इतके सुंदर आहेत की चाहते तिच्यावर घायाळ झाले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला असून ती फोटोसाठी वेगवेगळ्या पोज देत आहे. सृष्टीच्या फोटोंवर चाहते क्युट, सुंदर राजकुमारी अशा कमेंट करत आहेत.

सृष्टीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती नुकतीच कपिल शर्मा शोच्या नवीन सीझनचा एक भाग बनली आहे. सृष्टीने 2007 मध्ये बालाजी टेलिफिल्म्सच्या शोमधून आपल्या करीअरची सुरुवात केली होती, त्यानंतर तिने अनेक शो केले. छोटी बहूचा मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली. नंतर ती बिग बॉसमध्ये सहभागी झाली होती.

सृष्टीने मॉडेलिंगसुद्धा केली आहे. सध्या ती इन्स्टाग्रामवर आपल्या डान्सचे व्हिडिओ पोस्ट करत असते. तिने आपल्या बॅंकोकच्या सहलीतील काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यातील गुलाबी रंगाच्या ड्रेसवरील फोटो चाहत्यांना जास्त आवडले. या फोटोंना कॅप्शन देताना तिने लिहिले की, मी पुढील सहलीचा विचार करत आहेत.