करीना कपूरने होळीच्या निमित्ताने शेयर केला तैमू...

करीना कपूरने होळीच्या निमित्ताने शेयर केला तैमूरचा फोटो आणि स्वतःचा व्हिडियो… (Holi 2021: Kareena Kapoor Shares Holi Video And Cute Picture Of son Taimur)

करीना कपूरने होळीच्या सणाचं औचित्य साधून स्वतःचा एक कलरफुल व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये करीना रंग उधळत असताना दिसत आहे. सोबतच तिने होळीच्या रंगाने रंगून भिजलेल्या तैमूरचा क्यूट फोटोही शेअर केला आहे.

बेबो करीना कपूर खान अलीकडेच दुसऱ्यांदा आई झाली आहे. त्यामुळे यावर्षीची होळी करीनासाठी स्पेशल आहे. कपूर कुटुंबियांची होळी अशीही अतिशय प्रसिद्ध आहे. परंतु यावेळी करोनाची दुसरी लाट आलेली असल्यामुळे सेलिब्रेटी मित्रांसोबत होळी खेळण्याचे तिने टाळले आहे. करीनाने या होळीच्या खास दिनाकरिता इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत.

होळीच्या पहिल्या पोस्टमध्ये करीना कपूरने आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती रंग उधळत असताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले आहे की – ”अक्षय कुमार आणि शबीना सोबत होळीच्या सुखद आठवणी जाग्या करताना…” अक्षयकुमार सोबतच्या चित्रपटातील आपला हा व्हिडिओ करीना कपूरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये करीनाने आपला मुलगा तैमुरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन आहे –

“‘तुम्ही सर्व सुरक्षित राहा… माझ्याकडून हॅप्पी होली. या फोटोमद्धे होळीच्या रंगानी रंगून भिजलेला तैमुर अतिशय क्युट दिसत आहे.

पुरुषांच्या इंद्रियावर कमेंट करून दिया मिर्झाने माजवली खळबळ… (Dia Mirza’s Comment On Mens Private Part; People Surprised By Tweet)