सावळ्या रंगाने केला हिना खानचा घात : भूमिका गे...

सावळ्या रंगाने केला हिना खानचा घात : भूमिका गेली हातोहात (Hina Khan Reveals Getting Rejected From A Project Due To Her Dusky Complexion)

सध्या तरी हिना खानचे चित्रसृष्टीत नाव झाले आहे. तिची लोकप्रियता आहे, चाहतावर्ग मोठा आहे. पण तिचा रंग सावळा असल्याने, तिच्या हातची एक चांगली भूमिका गेली. त्या भूमिकेसाठी हिनाला नकारघंटा ऐकावी लागली. तिनं स्वतःच ही माहिती दिली आहे.

Hina Khan, Dusky Complexion

टाइम्स ऑफ इंडियाशी केलेल्या बातचितीमध्ये हिना म्हणते की, त्या सिनेमाचं मी नाव घेऊ इच्छित नाही. पण त्यामध्ये काश्मिरी युवतीची भूमिका करायला त्यांना एक अभिनेत्री हवी होती. मी स्वतः काश्मिरी आहे व तिकडची भाषा चांगलीच बोलते. म्हणून मला ती भूमिका करायला सोपी गेली असती. पण मी रंगाने सावळी असल्याने, मी काश्मिरी दिसत नाही, असं त्यांचं मत पडलं. त्या भूमिकेसाठी त्यांना एकदम गोरी कलाकार हवी होती.

Hina Khan, Dusky Complexion

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील अक्षराच्या भूमिकेतून हिना नावारुपास आली. आज तिच्या वेब सिरीज्‌ आणि म्युझिक अल्बम हिट होत आहेत. पण अशा काही संधी हातून गेल्याची चुटपुट तिला लागते.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम