हिना खानने १२ लाख रुपयांना गंडविले, जाणून पाया...

हिना खानने १२ लाख रुपयांना गंडविले, जाणून पायाखालची जमीन सरकेल (Hina Khan Has Been Accused Of Theft Of Rs 12 Lakh, Knowing That The Ground Will Slip Under Your Feet)

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही मालिकेतून घराघरात आपली ओळख निर्माण करणारी हिना खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हिना खान जितकी प्रतिभावान अभिनेत्री आहे तितकीच ती सुंदर आहे. परंतु तिच्यावर जो चोरीचा आरोप करण्यात आला आहे, ते जाणून घेतल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण हिना खानसारख्या अभिनेत्रीच्या अशा गोष्टींवर विश्वास ठेवणे अशक्य वाटते.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

टीव्हीच्या सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत हिना खानचा समावेश आहे. टीव्ही मालिकांव्यतिरिक्त तिने चित्रपटांमध्येही काम केले आहे आणि अनेक रिअॅलिटी शोमध्येही ती दिसली आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत हिनाने अक्षराची भूमिका साकारली होती, जी लोकांना खूप आवडली होती. या मालिकेने हिना खानला बरीच लोकप्रियता दिली.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

टीव्हीच्या सर्वात मोठ्या रिअॅलिटी शोपैकी एक असलेल्या ‘बिग बॉस’मध्ये हिनाने प्रवेश केला तेव्हा तिच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता, तेथेही ‘बिग बॉस’च्या घरात हिनाचा वेगळाच अवतार पाहायला मिळाला. कुणाला तो आवडला तर कुणाला नाही. बिग बॉसमधील तिच्या बेधडक शैलीमुळे अनेक चाहते तिला शेर खान असेही म्हणतात. बिग बॉसशिवाय ती ‘खतरों के खिलाडी’ मध्येही दिसली आहे. एवढेच नाही तर हिना खानने ‘इंडियन आयडॉल’ या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

एका ब्रँडची जाहिरात करण्यासाठी हिना खानने जवळपास १२ लाख रुपयांचे दागिने घेतले होते, परंतु नंतर तिने ते दागिने परत केले नाहीत. आहे ना धक्कादायक बाब? हिना खानसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रीकडून तुम्ही ही अपेक्षा करू शकता का? बातम्यांनुसार, ज्वेलरी डिझायनरने हिना खानला नोटीस देखील पाठवली होती, त्यानंतर अभिनेत्रीला सोशल मीडियावर खूप ट्रोल देखील केले गेले. मात्र, हिनाने ही केवळ अफवा असल्याचे म्हटले होते.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना हिना खानने ट्विट केले होते की, “मला आश्चर्य वाटते की मला पाठवलेली कायदेशीर नोटीस माझ्या घरी का पोहोचली नाही? पण सगळ्या मीडिया हाऊसमध्ये पोहोचली. मला दोष देणाऱ्यांनो मला माफ करा, पण असं चालणार नाही. काहीतरी नवीन करून पहा.”

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

विशेष म्हणजे श्रीनगरमध्ये जन्मलेल्या हिना खानने दिल्लीतून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. हिना खान गेल्या ८ वर्षांपासून रॉकी जैस्वालसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हा तोच रॉकी जैस्वाल आहे जो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत सुपरवायझिंग निर्माता होता.