पांढरा स्वीमसूट घालून हिना खानने केले आपल्या पि...

पांढरा स्वीमसूट घालून हिना खानने केले आपल्या पिळदार देहाचे प्रदर्शन (Hina Khan Flaunts Her Toned Body In White Swimsuit, Actress Shares Bold & Hot Photos From Maldives)

टेलिव्हिजनची लोकप्रिय नटी हिना खान, ३ दिवसांपूर्वी मालदीव बेटांवर रवाना झाली आहे. रॉकी जयस्वाल या आपल्या बॉयफ्रेंड सोबत ती या मिनी व्हेकेशनवर गेली आहे. तिथून ती आपले अंगप्रदर्शन करणारे फोटो पाठवते आहे. जे तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत.

त्या निसर्गरम्य बेटांवर हिना खान सूर्यस्नान घेताना दिसते आहे. त्याचे सुंदर व हॉट फोटोग्राफ्स तिने आपले फॅन आणि फॉलोअर्ससाठी पाठवले आहेत. सोशल मीडियावर हिनाने जे फोटो टाकले आहेत, ते पाहून तिचे चाहते चकित झाले आहेत.

पांढरा स्वीमसूट घालून हिनाने आपल्या कमनीय देहाचे जे प्रदर्शन मांडले आहे, त्यामध्ये ती फारच सुंदर आणि हॉट दिसते आहे.

तिने यासाठी आपले केस मोकळे सोडले आहेत. अन्‌ कमीत कमी मेकअप केला आहे.

हा पांढरा स्वीमसूट घालून ती स्विमिंग पूलमध्ये विहार करण्याच्या तयारीत दिसते आहे. त्याआधी तिने वेगवेगळ्या पोजेस्‌ दिल्या आहेत.

हे छान छान फोटो हिना खानने इन्स्टाग्रामवर प्रदर्शित केले आहेत.

आपल्या बॉयफ्रेंडसोबत ती कुरमथी बेटावर आहे.

फोटो प्रसिद्ध करून ती लिहिते – “ओशन ब्रीझ ॲट कुरमथी आयलंड लव्हिंग इट”

सोशल मीडियावर तिचे फोटो पाहून चाहत्यांनी बरेच कमेंटस्‌ दिलेत. एकजण म्हणतो, “हॉटनेस ओव्हरलोडेड.”

मालदीव बेटांवर हिना यापूर्वी आपला बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल सोबत गेल्या डिसेंबरात गेली होती.


चाळीशी गाठलेल्या श्वेता तिवारीने दाखवला जवानीचा जलवा