जांभळ्या रंगाच्या बॅकलेस टॉपवर हिना खानने शेअर ...

जांभळ्या रंगाच्या बॅकलेस टॉपवर हिना खानने शेअर केला सेक्सी फोटो..फोटो पाहून चाहते झाले घायाळ(Hina Khan Flaunts Her Sexy Back In Purple Backless Dress, Sets Internet On Fire)

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून अक्षरा म्हणून घराघरात पोहचलेली हिना खान ही टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आता तर ती सोशल मीडियावर देखील खूप प्रसिद्ध झाली आहे. हिना खान सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तिथे ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. हिनाने नुकतेच जांभळ्या रंगाच्या ड्रेसवरचे फोटो शेअर केले.  ते पाहून तिचे चाहते खूप घायाळ झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी हिनाने स्विमसूटमध्ये फोटो शेअर केले होते. त्यामुळे ती खूप चर्चेत सुद्धा आलेली. आता तिने पुन्हा एकदा जांभळ्या रंगाचा बॅकलेस ड्रेस घालून सोशल मीडियावरील वातावरण तापवले आहे. जांभळ्या रंगाची पॅण्ट आणि ब्रालेट घालून ती अंगप्रदर्शन करत आहे. या ड्रेसवर हिनाने नैसर्गिक मेकअप केला आहे तर केस साधेच बांधले आहेत. कानातले आणि हलक्या मेकअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

जांभळ्या रंगाच्या या बॅकलेस टॉपवर हिना खूप हॉट आणि बोल्ड दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते अगदी घायाळ झाले आहेत. तिच्या या फोटोंवर हजारोने लाइक्स येत आहेत. तर कमेंटचा पाऊस पडत आहे.

हिनाच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच सेवन वन या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे.तर लवकरच तिचा  ‘कंट्री ऑफ ब्लाइंड’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.