नवऱ्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिलिटरीत भरती ...

नवऱ्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिलिटरीत भरती झालेली वीरपत्नी, लेफ्टनंट कनिका राणे ‘करोडपती’ कार्यक्रमात (Heroic Wife Lieutenant Kanika Rane To Grace Marathi ‘Crorepati’)

Lieutenant Kanika Rane, Marathi Crorepati

देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या आणि देशाचं रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या पतीचं, मेजर कौस्तुभ राणे यांचं देशसेवेचं व्रत पुढे नेण्यासाठी त्यांच्या पत्नी लेफ्टनंट कनिका राणे या स्वतः सैन्यात भरती झाल्या. नोव्हेंबर २०२० मध्ये कनिका आर्मीमध्ये रुजू झाल्या. आता कनिका यांना कौस्तुभ यांची स्वप्नं पूर्ण करायची आहेत आणि अनेक वीरपत्नींसाठी काम करायचं आहे.  ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या कर्मवीर विशेष भागामध्ये त्या स्पर्धक म्हणून खेळायला येणार आहेत. या खेळात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी त्यांना साथ देणार आहेत. अनेक हिंदी-मराठी चित्रपटांतून प्रेक्षकांनी सोनालीला पाहिलेलं आहे. सोनाली आणि लेफ्टनंट कनिका मिळून हा ज्ञानाचा खेळ खेळणार आहेत. या विशेष भागात कनिका यांनी कौस्तुभ यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय कसा घेतला, हेही सांगितलं.

Lieutenant Kanika Rane, Marathi Crorepati

या वेळी कनिका यांनी आपल्या कोटला एक पिन लावली होती, सचिन खेडेकरांनी त्याबद्दल विचारल्यावर ‘ती मेजर कौस्तुभ यांची असून त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ती लावली असल्याचं’ त्यांनी सांगितलं.

या मंचावर जिंकलेल्या पैशातून लेफ्टनंट कनिका राणे आणि सोनाली कुलकर्णी या ‘बॅटल कॅज्युअल वेल्फेअर फंड’ या संस्थेला मदत करणार आहेत.