शिकागो येथील इस्कॉन मंदिराच्या शिलालेखाचे अनावर...

शिकागो येथील इस्कॉन मंदिराच्या शिलालेखाचे अनावरण हेमा मालिनी यांच्या हस्ते (Hema Malini Unveils Inscription Of Chicago’s Iskcon Temple)

ड्रीम गर्ल हेमा मालिनी (Hema Malini) अतिशय कृष्णभक्त आहे, हे सगळ्यांना माहीत आहेच. मुंबईतील इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीला ती आवर्जून हजर असते. आता शिकागो येथील इस्कॉन मंदिरातील (Chicago’s Iskcon Temple) शिलालेखाचे अनावरण तिच्या हस्ते झाले, याबद्दल ती आनंदित आहे.

सोशल मीडियावर हेमा मालिनीने शिकागोच्या मंदिरातील कार्यक्रमाचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. त्यामध्ये हेमा, राधा कृष्णाची पूजाअर्चा करताना, तसेच श्री प्रभुपाद यांना प्रणाम करताना दिसते आहे.
पिवळ्या साडीत ड्रीमगर्ल सुंदर दिसत असून शिलालेखाचे अनावरण करताना दिसते आहे. हेमा मालिनी गेल्या कित्येक वर्षांपासून जन्माष्टमीला इस्कॉन मंदिरात नृत्याचा कार्यक्रम सादर करत आली आहे. मथुरेची खासदार असलेल्या या अभिनेत्रीने गेल्या वर्षी तेथील इस्कॉन मंदिरात गाणं देखील गायलं होतं.

Hema Malini
Hema Malini

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

Hema Malini
Hema Malini

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

Hema Malini

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम