आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हेमा मालिनी यां...

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हेमा मालिनी यांचा गौरव : गोव्यामध्ये दिमाखदार उदघाटन सोहळा संपन्न (Hema Malini Honoured As ‘Indian Film Personality 2021’ In Goa International Film Festival : Grand Opening At Panaji)

पणजी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये ५२व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे भव्य उदघाटन झाले. केंद्रीय माहिती व प्रसारण तथा युवा व्यवहार व क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत व चित्रसृष्टीतील प्रमुख कलाकारांच्या उपस्थितीत हा समारंभ झाला. या प्रसंगी कलाकारांनी मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले. या प्रसंगी सलमान खान, रणवीर सिं , मनोज वाजपेयी, सिद्धार्थ आनंद, मधुर भांडारकर असे बॉलिवूड मधील कलाकार व दिग्दर्शक हजर होते. ‘द किंग ऑफ द वर्ल्ड’ हा चित्रपट उदघाटनाचे आकर्षण ठरले.

९ दिवस चालणाऱ्या या चित्रपट महोत्सवात ७३ देशातील १४८ आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखविण्यात यत्नर असून इतर प्रकारातील चित्रपट धरून ३०० चित्रपट प्रदर्शित होतील.
या महोत्सवाचे उदघाटन करताना मंत्री महोदय अनुरागसिंह ठाकूर यांनी या ठिकाणी प्रथमच, जगभरातील प्रमुख ओटीटी  मंचाचा यात सहभाग आहे.

सुप्रसिद्ध अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी यांना अनुरागसिंह यांच्या हस्ते ‘भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व २०२१’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते उदघाटनाचे आकर्षण ठरले. त्याच प्रमाणे आंतरराष्ट्रीय चित्रसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मार्टिन स्कॉर सेझी आणि ईस्टबान साबो यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार, ठाकूर यांनी प्रदान केला.
– नंदकिशोर धुरंधर