हॅलो २०२३… मलायका अरोराने बॉयफ्रेंड अर्जुन कपूर...

हॅलो २०२३… मलायका अरोराने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरला किस करत केले नवीन वर्षाचे स्वागत… (Hello 2023… Says Malaika Arora, Actress Plants A Kiss On Beau Arjun Kapoor’s Cheeks As They Welcome The New Year)

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरसाठी हे नवीन वर्ष खूप खास असू शकते. त्यांच्या बोलण्यावागण्यातून तरी असे दिसून येतेय की ती पुन्हा लग्न करू शकते. हे चाहत्यांसाठी नवीन नसलं तरी त्यांच्या लग्नाच्या अफवा अनेकदा उडत असतात आणि अर्जुन कपूरने अशा अफवांवर अनेकदा नाराजीही व्यक्त केली आहे.

हे जोडपे सध्या एका अज्ञात ठिकाणी नवीन वर्ष साजरे करत आहेत. त्यांच्यासोबत वरुण धवन आणि नताशा दलालही आहेत. इतर मित्रमंडळीही आहेत. मलायका आणि अर्जुनने त्यांच्या इन्स्टा पेजवर पार्टी नाईटचा एक ग्रुप फोटोही शेअर केला होता आणि आता मलायकाने अर्जुनसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये अभिनेत्री तिच्या प्रियकराच्या गालावर किस करताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना दिसत आहे. मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- हॅलो 2023 आणि त्याच्या शेजारी हार्टचा इमोजी पोस्ट केला आहे. पुढे, अभिनेत्रीने लव्ह अँड लाइट देखील लिहिले आहे.

मलायकाने इंस्टा स्टोरीवर एक छान फोटोही पोस्ट केला आहे. याआधी त्यांनी जंगल सफारीची छायाचित्रेही पोस्ट केली आहेत, ज्यावरून ते कोणत्यातरी रंजक ठिकाणी गेल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

चाहतेही या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत, मात्र लोक त्यांना नेहमीप्रमाणे ट्रोल करत आहेत. मलायका आजकाल तिच्या मुव्हिंग इन विथ मलायका या चॅट शोमुळे खूप चर्चेत आहे, ज्यामध्ये ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील खूप खोल आणि मनोरंजक रहस्ये देखील उघड करताना दिसत आहे.