वजन कमी करण्यासाठी, हे स्नॅक्स खा! (Healthy Sna...
वजन कमी करण्यासाठी, हे स्नॅक्स खा! (Healthy Snacks For Weight Loss)

वजन कमी करण्यासाठी तुम्ही विशेष आहार घेत असाल, तर तुमच्या आहारात अशा निरोगी स्नॅक्सचा समावेश करा, जे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करतील. येथे नमूद केलेले हे स्नॅक्स तुमचं वजन कमी करण्यास मदत करू शकतात.
१. भाजलेले / उकडलेले रताळे : वजन कमी करत आहात तर तुमच्या आहारात रताळ्याचा समावेश करा. हे बीटा-कॅरोटीन आणि फायबरनी समृद्ध आहे आणि ते भाजून किंवा उकडून खाल्ल्याने तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही.

Photo Credit: pexels.com
२. मोड आलेल्या कडधान्याचं सॅलड : हे पौष्टिक सॅलड प्रथिने, फायबर, जीवनसत्वं आणि खनिजांनी समृद्ध आहे. ते खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेलं राहतं आणि खाल्ल्यानंतर समाधानाची भावना राहते.
३. मिक्स सुकामेवा : काजू-बदाम-अक्रोड-अंजीर-मनुका या सुकामेव्याचे समान प्रमाणात सेवन केल्याने भूक कमी होते आणि लवकर भूक लागत नाही. तसेच वजन कमी करताना या मिक्स सुकामेव्यातून शरीराला पोषक घटक देखील मिळतात.

Photo Credit: pexels.com
४. अंड्यातील पांढरा भाग : अंड्यामधील पांढऱ्या भागात खूप जास्त प्रथिने असतात. वजन कमी करताना २-३ अंड्यांमधील पांढरा भाग खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते. हे कधीही स्नॅक म्हणून खाल्ले जाऊ शकते.
५. दही: एक चांगलं प्रोबायोटिक असल्याने, पोटाशी संबंधित सर्व आजार दूर करण्यास मदत होते. कॅल्शियम आणि प्रथिने असलेले, कमी चरबीयुक्त असे दही वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणून आहारात या पदार्थाचा समावेश आवश्यक आहे.

Photo Credit: pexels.com
६. मिक्स बिया : काळे आणि पांढरे तीळ, सूर्यफूलाच्या बिया, जवसाच्या बिया देखील निरोगी स्नॅक्स आहेत. त्यात फायबर, व्हिटॅमिन ई, फॅटी अॅसिड, मॅग्नेशियम आणि झिंक असतात, जे भूक शांत करतात.

Photo Credit: pexels.com
७. मखाना : खायला स्वादिष्ट लागणारा मखाना वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम नाश्ता मानला जातो. मखाना ग्लूटेन मुक्त आणि प्रथिने कर्बोदकांनी समृद्ध असतो. मखाना पॉपकॉर्नसारखा कुरकुरीत लागतो.
८. भाजलेले हरभरे : हरभरा हा प्रथिने आणि फायबरचा प्रमुख स्त्रोत असण्याबरोबरच, त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी असते, म्हणून हे एक निरोगी स्नॅक म्हणून खाल्ले जाऊ शकते. वजन कमी करण्यासाठी हा परिपूर्ण पर्याय आहे. यामुळे केवळ भूक तर शमतेच अन् जेवण झाल्यावर पोट बराच काळ भरलेले राहते.
९. शेंगदाणे : शेंगदाणे नाश्ता म्हणून देखील खाता येतात. ते पोटॅशियम, तांबे, कॅल्शियम, लोह आणि सेलेनियमने समृध्द असतात. तुम्ही ते संध्याकाळी किंवा सकाळी कधीही खाऊ शकता.

Photo Credit: pexels.com