आला पाऊस (Health Care And Diet Control)

आला पाऊस (Health Care And Diet Control)

पावसाळा म्हटला की आपण फारच स्वछं दी बनतो. आनंदाच्या उत्साहाच्या भरात आपल्याला हवं तस वागतो. खाण -पिणं, भटकणं अशा कोणत्याच गो ष्टीं साठी आपल्यावर निर्बंध लावलेले आवडत नाहीत आणि मग एके दिवशी आजारपण न बोलावता समोर येतं. मग तुम्ही पस्तावता त्या पेक्षा दरवर्षी येणार्‍या या पावसाला सामोरं जाण्यासाठी आधीच का तयार रहात नाही. थोडीफार काळजी घेतली तर आपण पावसाचा आनंद घेत आपल्या आवडीप्रमाणे जिभेचे चोचलेही पुरवू शकतो.

सर्वप्रथम पावसाळ्यात होणारी सर्दी, खोकला, वायरल ताप टाळण्यासाठी काय करावे ते पाहूया.
शक्यतो पावसात भिजू नका . भिजला तर लगेच ओले कपडे बदला. अंग, डोके, केस लगेच कोरडे करा. सर्दी, खोकला आटोक्यात ठेवला नाही तर न्युमोनिया होऊ शकतो.


प्यायचं पाणी उकळताना त्यात सुंठ पावडर घाला. दिवसभर थोडे थोडे गरम पाणी घ्या. घसा शेकला जाईल, तसेच शरीरातील टॉन्सिन्स निघून जातील.
व्हायरल ताप असेल तर पाण्यात तुळस, मध, हळद घालून काढा करा. गरमगरम घ्या. हर्बल टी ने हि तापाचा परिणाम कमी होतो.


बर्फ घालून केलेली थंड पेये टाळा. कोल्ड कॉफी, मिल्कशेक, कोल्ड्रिंक्स, थंड फळं. सरबतं पिऊ नका.
पाण्यात हळद घालून त्या पाण्याने किंवा सलाइन वटरने गुळण्या करा.
पावसात भिजल्यावर ओल्या कपड्यानी एसी रूममध्ये जाऊ नका.
दम्याचा त्रास असणार्‍यांनी दमट ओल्या भिंतीपासून लांब रहा. भिंतीवर बुरशी वाढली असेल तर त्यामुळे दम्याचा त्रास वाढ शकेल.
निलगिरी तेलाचे थेंब रुमालावर घेऊन अधूनमधून हुंगा. चोंदलेलं नाक मोकळं होण्यासाठी निलगिरी तेलाचे थोडे थेंब पाण्यात घालून, उकळून वाफारा घ्या. श्वास घेण सोपं झालं की पूर्ण शरीराला आराम मिळेल.
खराब हात न धुता चेहर्‍याला लावू नका. हातावर विषाणू असतील तर ते नाक, डोळे, तों डावाटे शरीरात प्रवेश करतील.
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहारात भाज्या, फळांचा वापर वाढवा. पावसाळ्यात काही गोष्टी टाळा.
पचायला जड पदार्थ खायचं टाळा.
भूक नसताना खाणं – पिणं टाळा.
रस्त्यावरचे उघड्यावरचे शिळे, माशा बसलेले पदार्थ, रस्त्यावरचे वडे, भज्यांचा कितीही मोह झाला तरी ते तेलकट पदार्थ पचायला जड असतात शिवाय अस्वच्छतेमुळे जंतुसंसर्गाचा धोका वाढतो.
पावसाळ्यात खराब हवामानामुळे मासे पकडले जात नाहीत तेव्हा या सुमारास मिळणारे मासे शिळे असण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी प्रॉन्स, खेकडे इत्यादी मासे खाल्यास विषबाधा होण्याचा धोका असतो.
रस्त्यांवर गाड्यांवर किं वा स्टोल्सवर मिळणारे व शिजवलेले पदार्थ म्हणजे सँडविचेस, चाट प्रकार, भेळ, पाणीपुरी सारखे पदार्थ टाळा.


रस्त्यावरचे कच्चेपदार्थ – फ्रूटप्लेट , फ्रूट सरबतं, उसाचा रस, नीरा या मधूनही जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोट बिघडू शकते.
काही तीव्र गंधाच्या फळांवर माशा बसतात. उघड्यावरचे फणसाचे गरे, ताडगोळे वगैरे खाऊ नका.
मोहरीचं, तिळाचं तेल पचण्यास जड असत. त्यांच्या वापराने पोट बिघडू शकते पित्तदोष वाढतो म्हणून पावसाळ्यात हि तेलं वापरू नका.
कॅफीनयुक्त पेय, चहा, कॉफी अतिप्रमाणात घेणं टाळा. त्यामुळे डिहायड्रेशन होत.
अति प्रमाणात मीठ वापरून केलेले खारे पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये. त्यामुळे उच्च रक्तदाबाची शक्यता वाढते.
अर्धवट शिजवलेली अंडी किंवा चिकन , मटण खाऊ नये ते पचायला जड आणि त्यामुळे जंतुसंसर्गाची शक्यता असते.
अशा पध्दतीने अगदी सध्या पध्दतीने आपण पावसात आपली काळजी घेऊ शकतो.