हीलिंग एक अनोखे क्षेत्र (Healing Method : A Car...

हीलिंग एक अनोखे क्षेत्र (Healing Method : A Career Option With Difference)

डॉक्टर अवनी राजाध्यक्ष यांना आधुनिक काळातील अध्यात्मिक विचार करणार्‍या म्हणजे स्पिरिच्युअल हिलर म्हणून ओळखले जाते. त्या पर्यायी उपचारपद्धती म्हणजेच अल्टरनेटिव मेडिसिनमध्ये एम. डी. झालेल्या आहेत आणि त्यांनी पी.एच.डी. देखील मिळवली आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून आपण डॉक्टर अवनी राज्याध्यक्ष यांच्याकडून हीलिंग या क्षेत्राची, तसेच या क्षेत्रात करिअर करण्यासाठी काय करता येईल याची माहिती जाणून घेणार आहोत.

प्रश्न: हीलिंग हे नक्की काय आहे? याबद्दल सोप्या भाषेत आम्हाला सांगा ?
उत्तर: हीलिंगला कोणत्याही प्रकारचा मराठी अनुवाद नाही. परंतु जर सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, हीलिंग म्हणजे बरे होणे. घाव किंवा जखम नैसर्गिक प्रक्रियेने भरुन येते, तेव्हा आपण हिल होतो.
प्रश्न: तुम्हाला स्वतःला या क्षेत्रामध्ये गोडी कशी निर्माण झाली ?
उत्तर: माझी सुरुवात अभिनय क्षेत्रातून झाली. तेव्हा या क्षेत्राशी घरातील कोणीही संबंधित नव्हते. त्यामुळे माझी आई खूप टेन्शन घ्यायची. ज्योतिषाकडे जा, माझी पत्रिका दाखव, पोथ्या वाचन वगैरे अशा गोष्टी तेव्हा तिने सुरु केल्या होत्या. मी तिच्यासोबत जायची. ते जे काही सांगायचे, त्यांची ती मांडणी, त्यांची सांगण्याची पद्धत याचे मला कुतूहल वाटायला लागले. तेव्हा असे वाटले की, हे शिकायला हवे. मी एका गुरुजींकडून हे शिकण्यास सुरुवात केली. पहिली सुरुवात ही टॅरो रिडींगने केली. त्यात आवड निर्माण झाली. मग मला समजलं, यात सोल्युशन्स काहीच नाहीये. पुढे एक-एक गोष्ट शिकत मला त्यात गती वाटायला लागली. आणि मग माझ्या आयुष्याकडे मी एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लागले.

प्रश्न: तुमचे स्वतःचे इन्फनाईट हीलिंग सेंटर आहे, तर तुमच्या या संस्थेबद्दल माहिती सांगा?
उत्तर: लग्न झाल्यानंतर अनेक दिवस मी घरात होते. नंतर नवर्‍याच्या सांगण्यावरून मी पुन्हा माझ्या कामाला सुरुवात केली. घर, मूल सांभाळून मला काय करता येईल? असा विचार करून मी या क्षेत्रात पूर्णपणे वळले. त्यानंतर 18 डिसेंबर 2010 रोजी मी इन्फनाईट हीलिंग हे हीलिंग सेंटर सुरू केले. यामागील उद्देश हाच आहे की, एकाच छताखाली विविध प्रकारच्या उपचार पद्धती उपलब्ध असाव्यात. त्यानंतर मी अल्टरनेटिव्ह मेडिसिनसाठी प्रवेश घेतला आणि मला पी.एच.डी. मिळाली.  
प्रश्न: हीलिंगमध्ये तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दोन उपकरणे तयार केली आहेत. ही नक्की काय उपकरणे आहेत?
उत्तर: 1. मी ओरा क्लेंजेर आय एच (जीर उश्रशपक्षशी ख क) या नावाचे पहिले यंत्र बनवले. त्यामध्ये लाईट थेरेपी, साऊंड थेरेपी आणि सायकिक थेरेपी आहे. सायकिक म्हणजे आपले ऊर्जा वर्क. या 3 गोष्टींचा समावेश या यंत्रामध्ये केला आहे. हे यंत्र बनवल्यानंतर साधारण 5 वर्षे मी त्याच्यावर काम करत होते. आता ते यंत्र बाजारात आणण्यासाठी पूर्णपणे तयार झाले आहे.
2) चक्र बॅलेन्सर आय एच (उहरज्ञीर इरश्ररपलशी ख क) या नावाचे दुसरे यंत्र आहे. आपली जी ऊर्जा स्थाने आहेत, त्यांना चक्र असे म्हणतात. ती दिसत नाहीत पण ती सायकिक ऑर्गन्स आहेत. या यंत्रामध्येही लाईट थेरेपी, साऊंड थेरेपी आणि सायकिक थेरेपी आहे. हे यंत्र सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि त्या बदल्यात आम्ही देऊ त्या सर्व प्रेस्क्रीप्शन मिळतात.

प्रश्न: या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी नक्की कोणत्या संधी उपलब्ध आहेत?
उत्तर: हीलिंग ही कोणत्याही प्रकारची टेक्निक नसून, एक लाईफस्टाईल आहे. म्हणजेच स्पिरिच्युअल अवेअरनेस. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा लाइफस्टाइल मधूनच आला पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रात याचा उपयोग होतो. लहान मुलांना आपण पॉझिटिव्ह अ‍ॅटीट्यूड शिकवला पाहिजे. म्हणजे लहानपणापासूनच काय शिकवायचं यासाठी शैक्षणिक सेक्टरमध्ये सुद्धा या गोष्टीला स्कोप आहे. मुलांचे रिपोर्ट काढणे, मुलांचे मानसिक आरोग्य तपासणे. सध्या प्रत्येक शाळेत एक सायकॉलॉजिस्ट देखील असतो, तिकडे सुद्धा तुम्हाला करिअरचा स्कोप आहे.
प्रश्न: या क्षेत्रामध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत ?
उत्तर:  अ‍ॅडव्हान्स कोर्सेसमध्ये रेकी लेवल, एंजल लेवल, टॅरो रिडींग, ग्रुमिंग, चक्रा, ऑरा, बॅच फ्लॉवर, न्युमरॉलॉजी अ‍ॅडव्हान्स, वास्तु ट्रॅडिशनल अ‍ॅडव्हान्स, वास्तु स्पिरिच्युअल अ‍ॅडव्हान्स, क्रिस्टल लेवल यासारखे डव्हान्स कोर्सेस आहेत. करन्सी नोट विश्लेषण,  ऑटोमॅटिक लिखाण, लोगो डिझाइनिंग, ग्रुमिंग, गर्भ संस्कार यासारखे अन्य कोर्सेस देखील आहेत. डिप्लोमा इन कंसेप्ट्स, डिप्लोमा ऑफ ग्रुमिंग, डिप्लोमा इन मोडलीटीएस, डिप्लोमा इन स्पिरिच्युअल मार्केटिंग, डिप्लोमा इन स्पिरिच्युअल थेऊरमस हे पाच मास्टर्स डिप्लोमा इन हीलिंग कोर्सेस आहेत. जे आमच्याकडे उपलब्ध आहेत.

प्रश्न: एक महिला म्हणून तुम्ही इतर महिलांना काय मार्गदर्शन कराल?
उत्तर: माझा माझ्या सहेलींना एकच संदेश आहे, जर मी हे करू शकते तर तुम्ही देखील हे करू शकता. महिलांकडे सिक्सथ् सेन्स असतो. फक्त त्याचा व्यवस्थित वापर करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे महिलांनी नक्कीच या क्षेत्रात यावे आणि त्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावे. आणि याचा वापर त्यांनी स्वतःचे घर, आयुष्य, मूलं अन् आसपासचा परिसर नीट करण्यासाठी करावा. महिला ही जबाबदारी नक्कीच पेलू शकतात, असं मला वाटतं.
– गायत्री सरला दिनेश घुगे