साजिद खानवर आणखी एका मॉडेलने केले गंभीर आरोप, म...

साजिद खानवर आणखी एका मॉडेलने केले गंभीर आरोप, म्हणाली ब्रेस्ट साइज वाढवण्यासाठी त्याने मला मसाज करण्याचा सल्ला दिला (‘He stared at my private parts.. Asked me to do Breast Massage to enlarge my breasts’ One More Model accuses filmmaker Sajid Khan of sexual harassment)

चित्रपट निर्माता साजिद खान याने जेव्हापासून बिग बॉसच्या घरात प्रेवश केला तेव्हापासून त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्यावर अनेक मुलींनी लैंगिक शोषण, आणि घाणेरडे कृत्य केल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्याला सतत ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. एकामागून एक अनेक मॉडेल आणि अभिनेत्री त्याच्या विरोधात वक्तव्य करत आहेत. शर्लिन चोप्रा, राणी चॅटर्जी, कनिष्का सोनी यांच्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने साजिदवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी साजिदवर अभिनेत्री-मॉडेल शीला प्रिया सेठने आरोप केले आहेत. शीलाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीत काम केले आहे.

मॉडेल-अभिनेत्री शीला प्रिया सेठने एका मीडिया हाऊसशी बोलताना सांगितले की, जेव्हा ती चित्रपटाच्या संदर्भात साजिद खानला भेटायला गेली होती, तेव्हा त्याने तिच्यासोबत अतिशय घाणेरडे कृत्य केले होते. 14 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेबद्दल शीला म्हणाली, “मी पहिल्यांदा 2008 मध्ये दिग्दर्शक साजिद खानला भेटले होते. जेव्हा मी त्याला त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये मला कास्ट करण्याची विनंती केली तेव्हा त्याचे माझ्यासोबतचे कृत्य पाहून मला धक्काच बसला.”

ती पुढे म्हणाली, “तो माझ्या प्रायव्हेट पार्टकडे 5 मिनिटे पाहत होता. मग तो माझ्या स्तनांकडे बघून म्हणाला की बॉलिवूडसाठी तुझे स्तन खूप लहान आहेत. त्याचा आकार वाढवावा लागेल. स्तनाची शस्त्रक्रिया कर.” एवढेच नाही तर त्याने मला ब्रेस्ट मसाज करण्याचा सल्लाही दिला होता. “त्यासाठी त्याने मला स्तनांना रोज तेलाने मालिश कर असे म्हटले होते.

साजिद खान गेल्या काही वर्षांपासून #MeToo च्या आरोपांना सामोरे जात आहे. साजिदवर शर्लिन चोप्रा, मंदाना करीमी यांसारख्या आणखी 10 हून अधिक अभिनेत्री आणि मॉडेल्सनी लैंगिक शोषणाचे घृणास्पद आरोप केले आहेत. सध्या साजिद खान बिग बॉसच्या घरात आहे. अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सनी त्याच्यावर गंभीर आरोप करत त्याच्या अटकेची मागणी केली आहे. त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्याची मागणीही सुरुवातीपासून होत आहे.