कांतारा फेम ऋषभ शेट्टी मांसाहारी जेवण सोडून केव...

कांतारा फेम ऋषभ शेट्टी मांसाहारी जेवण सोडून केवळ नारळ पाणी पित होता , अभिनेत्याने सांगितली कशी केली चित्रपटाची तयारी (He Quit eating non-veg, Did not consume anything except coconut water, Kantara (Kantara) Actor Rishab Shetty reveals toughest part of shooting the film)

ऋषभ शेट्टीचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘कांतारा’ हा चित्रपट देशभरात यशाचे नवे विक्रम करत आहे. या चित्रपटाचीच सर्वत्र चर्चा होत आहे. चित्रपटाला मिळणाऱ्या यशाची चित्रपटाचा नायक ऋषभ शेट्टी याने कधीच कल्पना केली नव्हती. यामुळे ऋषभ खूप खुश आहे. नुकताच तो सिद्धी विनायक मंदिरात गणपतीचे आशीर्वाद घेण्यासाठी गेला होता. याशिवाय अभिनेत्याने कांतारा चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी कशी तयारी केली होती हे सांगितले.

चित्रपटात एक दृश्य आहे, ज्यामध्ये दैव कोला नावाचा विधी केला जातो. या अंतर्गत गुलिका दैव कौलाचा विधी करतात. जेव्हा हा सीन चित्रित करायचा होता तेव्हा ऋषभने शूटिंगच्या २०-३० दिवस आधी मांसाहार सोडला होता. अभिनेत्याने सांगितले की, ‘ दैव कौला’च्या सीनमध्ये 50-60 किलो वजन उचलावे मला होते, म्हणून मी 20-30 दिवसांपूर्वी मांसाहार सोडला होता. मी दैव कौलाचा पोशाख घातल्यावर फक्त नारळपाणी प्यायचो. अजून काही नाही. शूटिंगनंतर मला प्रसाद दिला जायचा.

या चित्रपटाबाबत ऋषभ शेट्टीने आणखी एक धक्कादायक खुलासा केला. तो म्हणाला, ‘एका सीनमध्ये मला फायर स्टिकने म्हणजेच मशालीने मारणार होते. हे दृश्य खरे होते. मला खरोखर आगीच्या काठीने मारण्यात आले, त्यामुळे माझी पाठ पूर्ण भाजली.

हा सीन करणं खूप अवघड होतं. सीन झाल्यावर मी पडायचो, पण प्रत्येक वेळी मी पूर्ण उर्जेने उभा राहायचो, कारण मी ठरवलं होतं की ते करायचंच.अवघ्या 15 कोटींमध्ये बनलेल्या ‘ कांतारा’ने ‘ केजीएफ’ चा रेकॉर्डही मोडला आहे. या चित्रपटाने जगभरात 250 कोटींचा टप्पा ओलांडला असून अजूनही बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. ऋषभ शेट्टीने या चित्रपटात केवळ अभिनयच केला नाही, तर त्याचे दिग्दर्शनही केले आहे. त्याची कथाही त्यानेच लिहिली आहे.