‘सलमान खान माझ्या भावासारखा आहे’- ...

‘सलमान खान माझ्या भावासारखा आहे’- जॅकी श्रॉफने व्यक्त केल्या भावना ( ‘He Is Like Younger Brother To Me’- Jackie Shroff Has All Praise For Salman Khan)

अभिनेता जॅकी श्रॉफ आणि सलमान खानने ‘सिर्फ तुम’, ‘कहीं प्यार न हो जाए’, ‘क्योंकि’,’भारत’ यांसारख्या अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत पत्रकाराने जॅकीला, तुम्हाला सलमान खानमधील सर्वात जास्त आवडणारी गोष्ट कोणती ? असा प्रश्न विचारला. यावर जॅकी श्रॉफने उत्तर दिले की, सलमान खानमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खास आहेत. माझ्या आयुष्यात सलमान खानसारखे कोणीच नाही. एवढेच नाही तर जॅकीने सलमान अगदी त्याच्यासारखाच असल्याचे सांगितले.

जॅकीने पुढे म्हटले की, सलमान मला माझ्यासारखाच वाटतो. त्याचे कपडे, त्याचा चालण्याचा , बोलण्याचा अंदाज माझ्यासारखाच वाटतो. तो मला बघतच मोठा झाला आहे. तो मला माझ्या लहान भावासारखाच आहे. सलमान खान माझाच आहे असे मला वाटतो.

२०१९ मध्ये आलेल्या भारत या चित्रपटात सलमान खानच्या वडीलांची भूमिका जॅकी श्रॉफने साकारली होती. खरेतर या दोघांमध्ये फक्त १० वर्षांचा फरक आहे. जॅकीने मुलाखतीत सांगितले की, आम्ही साधारण एकत्रच आमच्या करीअरची सुरुवात केली होती. पण आता मला त्याच्या वडीलांची भूमिका साकारायला काहीच हरकत नसते. मी तर सलमानला नेहमीच माझ्या मुलासारखाच सांभाळतो.

जॅकी श्रॉफच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी जून २०२२ मध्ये त्यांच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली होती. त्यात ते मिथुन चक्रवर्ती आणि संजय दत्तसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव बाप असे असेल.