वयाच्या ४७ व्या वर्षीसुद्धा अभिनेत्री शिल्पा शे...

वयाच्या ४७ व्या वर्षीसुद्धा अभिनेत्री शिल्पा शेट्टी दिसते एवढी फिट आणि सुंदर: जाणून घ्या त्यामागील डाएट सीक्रेट. (HBD Shilpa Shetty: How Shilpa Shetty is Ageing in Reverse, Know Her Fitness And Diet Secrets)

बॉलिवूडची फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी ही आज ८ जूनला तिचा ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. मोठ्या पडद्यावरुन जरी शिल्पा गायब झाली असली तरी तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरस लूकसाठी ती नेहमीच चर्चेत असते. यावर्षी ती ४७ वर्षांची झाली असल्याचे तिच्याकडे बघून कोणीच म्हणू शकत नाही.

शिल्पा सोशल मीडियावर तिचे योगाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करुन तिच्या चाहत्यांना योगासाठी नेहमी प्रोत्साहित करत असते. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिच्या फिटनेस, डाएट आणि ब्यूटी रुटीनबद्दल सांगणार आहोत.  हे जाणून घेतल्यानंतर तुम्हीही तुमच्या उतारवयात शिल्पाप्रमाणे फिट आणि सुंदर दिसण्याचा प्रयत्न करु शकाल.

शिल्पा रोज सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिते. त्यानंतर ती नोनी ज्यूस पिते. या ज्यूसमध्ये अॅण्टी कॅन्सर आणि अॅण्टी ऑक्सीडेंटचे गुण असतात शिवाय हा ज्यूस ह्रुदयासाठी सुद्धा गुणकारी असतो.

ऑइल पुलिंग फॉर माउथ हायजीन
तोंडाच्या आरोग्यासाठी अनेक अभिनेत्री ऑइल पुलिंग करतात. शिल्पा शेट्टीसुद्धा ही एक्सरसाइज करते. यासाठी ती दोन चमचे नारळाचे तेल तोंडात ठेवून थोड तेल संपूर्ण तोंडात फिरवते.

योगा
त्यानंतर शिल्पा योग करते. शिल्पाच्या मते योग हा शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा गरजेचा असतो.  एका मुलाखतीत शिल्पाने सांगितले होते की १७ वर्षांपूर्वी शिल्पाने योग करण्यास सुरुवात केली. तिला एकदा दुखापत झाली होती. त्यावेळी तिच्या फिजियोथेरेपिस्टने तिला योग करण्याचा सल्ला दिला. पुढे जाऊन तोच योग तिचे व्यसन होईल याची तिला कल्पनादेखील नव्हती. या व्यसनाचा तिच्या शरीरावर आणि मनावर खूप चांगला फरक पडला. आता ती योगशिवाय राहूच शकत नाही. शिल्पा आठवड्यातून ५ दिवस वर्कआउट, २ दिवस योगा , २ दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि एक दिवस कार्डियो करुन स्वत:ला फिट ठेवते.

आहार
शिल्पा तिच्या खाण्यापिण्याची खूप काळजी घेत असते.

शिल्पा सकाळी ७-८ वाजता नाश्ता करते. तिच्या नाश्त्यात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश असतो. त्यात ती ओट्स, ताजी फळं आणि स्मूदी पिते.

दुपारच्या जेवणात ब्राउऩ किंवा व्हाइट राइस असतो. सोबत चिकन किंवा मासे असतात. याशिवाय भाज्या आणि सॅलाड सुद्धा ती खात असते. दुपारच्या जेवणात शिल्पा एक चमचा तूप खाते जे शरीरासाठी अत्यावश्यक असतं.

संध्याकाळच्या न्याहारीत ती सॅण्डवीच खाणे पसंत करते.

शिल्पाचे रात्रीचे जेवण फार हलके असते. त्यात ती सूप किंवा भाज्यांसोबत चिकन खाते.

गोड खायची इच्छा झाल्यास ती शेंगदाण्याची चिक्की खाते.

शिल्पाचा रविवारचा चीट डे खूप प्रसिद्ध आहे. ती दर रविवारी तिच्या मनाला वाटेल ते खाते व त्याचे व्हिडिओ, फोटो ती पोस्ट करत असते. या चीट डे ला ती रबडी जिलेबी, रसगुल्ला, बिर्यानी, चॉकलेट अशा चमचमीत पदार्थांची मजा घेते.