लाइमलाइटपासून दूर असलेल्या आरवला वाढदिवसाच्या श...
लाइमलाइटपासून दूर असलेल्या आरवला वाढदिवसाच्या शुभेच्छा…पाहा फोटो (HBD – Akshay Kumar’s Son Aarav Turns 19)

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना त्यांचा मुलगा आरव आज १९ वर्षांचा झाला आहे. आरवच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ट्विंकलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत ट्विंकलने आरवला शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्विंकलने ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ट्विंकलने आरवचा आणि तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ते दोघे झाडाखाली बसले आहेत. या फोटोत आरवने मल्टि कलरचा टी-शर्ट परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत ‘माझा सुंदर बर्थडे बॉय’ अशी कॅप्शन ट्विंकलने दिली आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
लाइमलाइटपासून दूर असलेल्या काही मोजक्या स्टार किड्समध्ये आरवची वर्णी लागते. त्याला आपण अक्षय कुमारचा मुलगा आहे, असे सांगत मिरवायला देखील आवडत नाही.

आरव आपल्या वडिलांप्रमाणेच स्मार्ट आणि तंदुरुस्त आहे. तंदुरुस्तीसाठी तो नियमित वर्कआउट करतो. त्याने लंडनमध्ये कुकिंग कोर्सही केला आहे.
४ वर्षांचा असल्यापासून आरवने मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. त्याने जुडो कराटेमधे फर्स्ट डिग्री ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. तसेच जुडो चॅम्पियनशीपमध्ये त्याने गोल्ड मेडल मिळवलं आहे.

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आरव हा खरोखरच अतिशय गुणी मुलगा असल्याची पावती दिली आहे.
आरव आपल्या वडिलांप्रमाणेच कौटुंबिक आहे. त्याला फारसे मित्र नाहीत. सैफ अली खानच्या इब्राहमसोबत त्याचं बऱ्यापैकी जमतं. आरवला त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.