लॉकडाउन दरम्यान मुलांच्या अभ्यासाच्या सवयी बिघड...

लॉकडाउन दरम्यान मुलांच्या अभ्यासाच्या सवयी बिघडल्या आहेत का? (Have Children’s Learning Habits Deteriorated During Lockdown?)

मागच्या वर्षी दहावी-बारावीच्या परीक्षा संपता संपता आणि इतर मुलांच्या परीक्षा चालू असतानाच करोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. आणि आता पुन्हा एक वर्षाने अगदी तशाच किंबहुना त्यापेक्षा अधिक कठिण परिस्थिती आली आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे वर्षभर मुलांना शाळेत जाता आलं नाही. शिवाय ऑनलाईन शाळेमुळे मुलांचं शिक्षण आणि अभ्यास यावर फारच वाईट परिणाम झालेला अनुभवास आलं आहे. बऱ्याच मुलांना ऑनलाइन क्लासेसमधून अभ्यास समजून घेणं कठीण गेलं आहे. त्यांचं अभ्यासातील लक्षही कमी झालेलं आहे.

मुलांनी लॉकडाऊन दरम्यानचा बराच मोठा काळ हा शाळेत न जाता घरीच घालवला आहे. या करोनाने मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. मुलांना पहिल्यासारखं घराबाहेर जाऊन खेळता येत नाहीये, त्यामुळे बरीच मुलं ही चिडचिडी झाली आहे. आता शाळा चालू झाल्यानंतर मुलांमध्ये पहिल्यासारखी अभ्यासाची गोडी आणण्यासाठी शिक्षक आणि पालक दोहोंनाही मोठी कसरत करावी लागणार असल्याचं चित्र दिसतंय. याबाबत तुमचं काय मत आहे? लॉकडाऊनमध्ये मुलांच्या अभ्यास करण्याच्या सवयी बिघडल्या आहेत, असे तुम्हाला वाटते का?

तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून अवश्य सांगा. तुमतं मत आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.