करोनाग्रस्तांना प्राणवायू मिळावा म्हणून हर्षवर्...

करोनाग्रस्तांना प्राणवायू मिळावा म्हणून हर्षवर्धन राणेने विकली बाईक (Harshvardhan Rane puts His Bike on Sale for ‘Oxygen Concentrators’ To Help Corona Patients)

देशामध्ये आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. जगभरातून लोक मदतीसाठी पुढे येत आहेत. अशा बिकट परिस्थितीमध्ये अनेक कलाकार आपापल्या परीने मदत करत आहेत. अभिनेता हर्षवर्धन राणे देखील गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. गरजू लोकांना ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी त्याने आपली रॉयल एनफील्ड बाइक विकण्याचा निर्णय घेतला असून, तो निर्णय आपल्या चाहत्यांबरोबर त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

हर्षवर्धन राणेने २०१४ मध्ये ही बाईक घेतली होती. इन्टाग्रामवरील फोटोमध्ये तो आपल्या आवडत्या बाईकसोबत दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले आहे, ‘प्लीज कुणी तरी माझी ही बाईक विकत घ्या… त्या मिळणाऱ्या पैशांतून मी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर विकत घेऊन ज्यांना गरज आहे त्यांना मदत करीन…हैदराबादमध्ये मला चांगल्या गुणवत्तेचे ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर हवे आहेत….’

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

गेल्यावर्षी करोनाची पहिली लाट जेव्हा आली होती, तेव्हा ऑक्टोबरमध्ये हर्षवर्धनला करोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले होते. चार दिवस त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. या अनुभवातून गेल्यामुळेच हर्षवर्धनने लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. गरजवंतांसाठी ऑक्सीजन कन्संट्रेटर घेता यावेत यासाठी तो आपली बाईक विकत आहे.

फोटो सौजन्य:इंस्टाग्राम

करोना दरम्यान हर्षवर्धन राणेने, करोना आणि त्यासंबंधीत सुरक्षिततेबाबत अनेक पोस्ट केलेल्या आहेत. हर्षवर्धनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच तो ‘कुन फाया कुन’ या चित्रपटात दिसणार आहे. यापूर्वी २०२० मध्ये वेब पोर्टलवर प्रदर्शित झालेल्या ‘तैश’ या चित्रपटात तो दिसला होता.