विश्वसुंदरी हरनाज संधू, या तिघींसोबत काम करायला...

विश्वसुंदरी हरनाज संधू, या तिघींसोबत काम करायला उत्सुक : बॉलिवूडमधील कास्टींग काऊच बाबत व्यक्त केलं मत (Harnaaz Wants To Do A Film With These 3 Actresses : Also Said Big Thing About Casting Couch)

२१ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर भारताला मिस युनिव्हर्सचा सन्मान मिळवून देणाऱ्या हरनाज संधूचं नाव सध्या देशातच नव्हे तर जगात परिचयाचं झालं आहे. तिच्या चाहत्यांना ती आता यापुढे काय करणार हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. हरनाज ही अभिनेत्री आणि मॉडेल  आहेच. तिने याआधी पंजाबी चित्रपटांमध्ये पदार्पण केले आहे. लवकरच तिचे दोन पंजाबी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहेत. आता हरनाजला बॉलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण करायचे आहे. एका मुलाखतीदरम्यान हरनाजने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक योजनांबद्दल सांगितले. त्यात तिने तिला कोणत्या व्यक्तीला डेट करायला आवडेल आणि कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रींसोबत काम करायला आवडेल हे देखील सांगितले.

Casting Couch

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत हरनाजने सांगितले की, तिला सध्या तरी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची घाई करायची नाही. तिला बॉलिवूडमध्ये यायचे असेल, तेव्हा ती निश्चितपणे सगळ्यांना अपडेट करणार असल्याचे तिने सांगितले आहे.

Casting Couch

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान हरनाजने सांगितले होते की, तिला सुपरस्टार शाहरुख खानसोबत बॉलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण करायचे आहे. त्याचवेळी, जेव्हा हरनाजला विचारण्यात आले की तिला कोणत्या अभिनेत्रीसोबत चित्रपटात काम करायचे आहे, तेव्हा ती म्हणाली, ” मला प्रियंका चोप्रा, लारा दत्ता आणि सुष्मिता सेनसोबत काम करायला आवडेल. आम्ही सर्व एकाच चित्रपटात असलो तर महिला सक्षमीकरणाबाबत तो मोठा संदेश असेल. आम्ही सर्व एकत्र पुन्हा इतिहास घडवू शकतो.”

Casting Couch

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

दुसरीकडे, हरनाजला जेव्हा विचारण्यात आले की, तुम्हाला श्रीमंत वृद्ध व्यक्ती किंवा स्ट्रगलिंग व्यक्ती यापैकी कोणाला डेट करायला आवडेल? या प्रश्नाला उत्तर देताना हरनाज म्हणाली, “मला संघर्ष करणाऱ्या एका तरुण मुलाला डेट करायला आवडेल. याचे कारण मी स्वतः संघर्ष केला आहे आणि करत राहीन. एक माणूस म्हणून माझा विश्वास आहे की संघर्ष खूप महत्त्वाचा आहे, कारण हीच एक गोष्ट आहे ज्यानंतर आपल्याला आपल्या यशाची किंमत समजते.”

Casting Couch

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

आपल्या मुलाखती दरम्यान या सगळ्याशिवाय हरनाज संधूने कास्टिंग काऊचच्या मुद्द्यावरही भाष्य केले. तिला विचारण्यात आलेल्या बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊचसारखे काही असू शकते का? या प्रश्नाच्या उत्तरात हरनाज म्हणाली, “खरं सांगायचं तर, जेव्हा तूम्ही बॉलीवूडमध्ये प्रवेश करता तेव्हा तुमच्यासमोर कोणत्या प्रकारची परिस्थिती असते हे मला माहीत नाही. तथापि, हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते की, ती त्यावेळी काय निर्णय घेते. खरं तर आत्ताच याबद्दल बोलणे खूप घाईचे ठरेल. माझ्यावर निर्णय घेण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा माझ्या निर्णयामध्ये नक्कीच माझं कुटुंब माझ्यासोबत असेल.”

Casting Couch

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

मिस यूनिव्हर्स हरनाज कौर संधुने लहान वयात मोठे यश मिळवले आहे. सगळेच तिच्या बॉलिवूडमधील पदार्पणाची वाट पाहताहेत. लवकरच चाहत्यांची इच्छा पूर्ण होईल अशी आपण आशा बाळगुया.