२१ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताची हरनाज संधू ...

२१ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताची हरनाज संधू बनली ‘मिस युनिव्हर्स २०२१’ (Harnaaz Sandhu Brings Home Miss Universe Crown After 21 Years)

भारताच्या हरनाज कौर संधूने (Harnaaz Sandhu) मिस युनिव्हर्स २०२१ (Miss Universe 2021) चा खिताब जिंकला. इस्रायलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ८० देशांतील स्पर्धकांनी भाग घेतला होता, ज्यामध्ये हरनाजने मिस युनिव्हर्सचा पुरस्कार जिंकून पुन्हा एकदा देशाचा अभिमान उंचावला. तब्बल २१ वर्षांनंतर भारताला हा आनंदाचा क्षण पाहायला मिळाला. याआधी २००० सालामध्ये मॉडेल-अभिनेत्री लारा दत्ताने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. सर्वप्रथम, मॉडेल-अभिनेत्री सुष्मिता सेन हिने मिस युनिव्हर्स स्पर्धेत प्रथमच हा पुरस्कार जिंकून देशाचा गौरव वाढविला. आता या यादीत हरनाज संधूचाही समावेश झाला आहे.

Harnaaz Sandhu Miss Universe 2021

मूळची चंदिगडची असलेल्या हरनाजने तिच्या सौंदर्याने आणि तिच्या उत्तरांनी परीक्षकांची मने जिंकली. देशाची कन्या हरनाज संधू हिचे या अद्वितीय यशाबद्दल सर्व मान्यवर आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या!

२००० साली मिस युनिव्हर्सचा किताब मिळविलेल्या लारा दत्ताने हरनाज कौर संधूचे अभिनंदन केले आणि सांगितले की, आम्ही यासाठी २१ वर्षे प्रतीक्षा केली आहे. मिस युनिव्हर्स क्लबमध्ये आपले स्वागत आहे. कोटी जनतेची स्वप्ने साकार झाली. आम्हाला तुझा अभिमान आहे….

Harnaaz Sandhu Miss Universe 2021
Harnaaz Sandhu Miss Universe 2021
Harnaaz Sandhu Miss Universe 2021
Harnaaz Sandhu Miss Universe 2021
Harnaaz Sandhu Miss Universe 2021
Harnaaz Sandhu Miss Universe 2021
Harnaaz Sandhu Miss Universe 2021

Harnaaz Sandhu Miss Universe 2021

माझी सहेलीकडून हरनाज कौर संधूचे खूप खूप अभिनंदन! अभिनंदन!

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम