‘हरिओम’ मध्ये शिवाजी महाराजांचे दोन...

‘हरिओम’ मध्ये शिवाजी महाराजांचे दोन वीरबंधू तान्हाजी व सूर्याजी यांच्या बंधूप्रेमाची शौर्यकथा (‘Hari Om’ Is The Heroic Story Of Two Loyal Mavla Brothers From The Army Of Shivaji Maharaj)

महाराष्टाचे आराध्यदैवत, आदरस्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे उमरठचे दोन वीर बंधू मावळे  सिंह तान्हाजी आणि सूर्याजी यांच्या बंधूप्रेम व शिवप्रेमाला प्रेरित झालेल्या दोन भावंडांची  कथा  म्हणजेच ‘हरिओम’ लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला…

‘हरिओम’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली होती. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. मर्दानी छातीचे, कर्तव्यदक्ष मावळे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे आदरस्थान म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूल्यांवर आणि त्यांच्या मावळांच्या निष्ठेवर आधारलेला सिनेमा  म्हणजे ‘हरी ओम’  असे एकंदर चित्र दिसत आहे. हरिओम घाडगे ह्यांनी एक कलाकार आणि निर्माता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.

नुकताच ‘हरी ओम’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. भगवा झेंडा, डोळे दिपतील अशी महाराजांची झलक आणि पिळदार शरीरयष्टी, सळसळत्या रक्ताचे, निधड्या छातीचे दोन भाऊ म्हणजेच नव्या युगातील मावळे हरी आणि ओम आपल्याला या मोशन पोस्टर मध्ये दिसले. हरिओम घाडगे आणि गौरव कदम, सलोनी सातपुते, तनुजा शिंदे प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत.

सर्व प्रेक्षक वर्ग ज्याची आतुरतेने वाट पाहत होता ते म्हणजे  या चित्रपटाची तारीख घोषित झालेली आहे. श्री हरी स्टुडिओज्‌ निर्मित, आशिष नेवाळकर आणि  मनोज येरुणकर  लिखित आणि दिग्दर्शित ‘हरी-ओम’ हा चित्रपट १४ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.

नव्या पिढीला शिवबांच्या  विचारधारेने प्रेरित झालेल्या हरी आणि ओम या आजच्या युगातील मावळ्यांची आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाला एकतेचे संदेश देणारा चित्रपट ‘हरिओम’ येतोय १४ ऑक्टोबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.