‘प्रत्येक हिंदुस्तानी माणसाने ‘द का...

‘प्रत्येक हिंदुस्तानी माणसाने ‘द काश्मीर फाइल्स’ पहिला पाहिजे’ – आमीर खानचं वक्तव्य (‘Har Hindustani Ko Dekhni Chahiye…’ Aamir Khan Reacts To The Kashmir Files)

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची तोंडभरून प्रशंसा होत आहे. त्यामध्ये आता आमीर खानचे नाव जोडले गेले आहे. आमीर दिल्लीमध्ये ‘आर आर आर’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेला असता म्हणाला की, मी  ‘द काश्मीर फाइल्स’ अद्याप पाहिलेला नाही. पण अवश्य पाहीन.

प्रत्येक हिंदुस्तानी माणसाने हा चित्रपट पहिला पाहिजे, असं सांगून पुढे आमीर म्हणाला ‘काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांबाबत जे काही घडलं, ते अतिशय दुःखद आहे. अशा विषयावर एखादा चित्रपट बनतो, तेव्हा इतिहासात काय घडलं ते प्रत्येक हिंदुस्तानीने लक्षात ठेवलं पाहिजे. मन व्यथित होइल, असा हा इतिहास आहे. माणसावर अत्याचार होतो, तेव्हा त्याला काय वाटेल, हे चित्रपट पाहून लक्षात येत.’

आमीर पुढे म्हणतो, ‘माणुसकीवर ज्यांचा विश्वास आहे, त्या माणसांच्या भावनांना या चित्रपटाने हात घातला आहे. हे या चित्रपटाचं वैशिष्टय आहे.’ आमीरने स्वतः हा चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या चित्रपटाला मिळालेलं यश पाहून त्याने आनंद प्रदर्शित केला आहे.

या चित्रपटात १९९० साली काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार व त्यांनी केलेले पलायन याच्या सत्य घटना दाखविण्यात आल्या आहेत.