हॅपी हग डे! जादूची झप्पी द्या… हे फायदे अ...

हॅपी हग डे! जादूची झप्पी द्या… हे फायदे अनुभवा (Happy Hug Day: Amazing benefits of hugging you should know about)

एखाद्याला मिठीत घेणं किंवा एखाद्याच्या मिठीत शिरणं हे प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम असलं तरी आपल्या आवडत्या व्यक्तीस मिठी मारण्याचे अनेक फायदे आहेत. मिठीमुळे नात्यातील मिठास वाढते आणि नातं मजबूत बनतं. आरोग्याच्या दृष्टीनेही मिठीचे अनेक फायदे आहे. आज हग डेच्या निमित्ताने आपण त्याचे फायदे काय आहेत ते पाहुया.

१. मिठी जितकी घट्ट तेवढं नातंही घट्ट बनतं

आपण आपल्या आवडत्या व्यक्तीस घट्ट मिठी मारून त्या व्यक्तीबाबतच्या आपल्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे मिठी जेवढी घट्ट तेवढं नातंही घट्ट आणि अतूट बनतं. अभ्यासातूनही असं सिद्ध झालं आहे की, जे नवरा-बायको एकमेकांना नेहमी आलिंगन देतात, त्यांचं नातं दीर्घकाळ टिकतं आणि त्यांच्या नात्यामध्ये प्रेमही कायम राहतं.

२. रक्तदाब स्थिर ठेवते

जादूची झप्पी म्हणजेच मिठीचे आरोग्यदायी फायदे सांगायचे तर यामुळे रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येते. मिठीमुळे शरीरातील ऑक्सीटोसिन रक्तात मिसळते आणि उच्च रक्तदाब नियंत्रित होतो. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी आपला जोडीदार, मुलं आणि मित्रमैत्रिणींस जादूची झप्पी द्यावी.

३. एकमेकांमधील बाँडिंग आणि नात्यातील प्रेमही वाढते

बरेचदा काही न बोलता केवळ मिठीमुळे नात्यावर चमत्कारीक परिणाम होतो. रात्रभर आपल्या जोडीदाराच्या मिठीत झोपून पाहा, पहाटे तुम्ही अतिशय उत्साही आणि सकारात्मक अनुभूती घ्याल. शिवाय संपूर्ण दिवस उत्स्फूर्ततेणे काम कराल. एकमेकांना मिठीत घेतल्यामुळे नवरा-बायकोंमधील बाँडिंगही घट्ट बनते.

४. तणावमूक्त राहण्यास मदत करते

मिठीमध्ये खरंच जादू आहे. कोणी प्रेमाने मिठी मारल्यास त्या व्यक्तीचा सर्व ताण लगेच दूर होतो. मिठीमुळे रक्तात ऑक्सीटोसिन आणि कोर्टिसोल हे दोन हार्मोन्स स्त्रवू लागतात. या हार्मोन्समुळे तणाव दूर होण्यास मदत होते. तेव्हा तणावमुक्त राहायचं असेल तर आपल्या पार्टनरला एक जादूची झप्पी देणे बनतंच!

५ नैराश्य दूर पळविते

रक्तामध्ये वाढणाऱ्या ऑक्सिटोसिनचीच ही कमाल आहे. या हार्मोनमुळे नैराश्य आणि अस्वस्थता निघून जाते. तेव्हा निराश व्हायचं नाही, तसं वाटलंच तर आपल्या जोडीदाराला मिठी मारा.

६. छान झोप लागते

एकमेकांपासून स्वतंत्रपणे झोपणाऱ्या नवरा-बायकोंपेक्षा एकमेकांच्या मिठीत झोपणारे नवरा-बायको अतिशय शांत झोप घेतात. कारण जोडीदाराच्या कवेमध्ये अधिक सुरक्षित वाटतं आणि कोणतीही चिंता सतावत नाही. शिवाय आरामदायक आणि शांत झोप झाल्याने दुसऱ्या दिवशी उठताना तुम्ही अगदी ताजेपणा अनुभवता.

७. जोडप्यांमध्ये सामंजस्य वाढविते

मिठीमुळे नाती चांगली बहरतात. एकमेकांमध्ये सामंजस्य वाढतं. आजूबाजूचं वातावरणही आनंदी बनतं. म्हणूनच नाती अधिक सुंदर बनवायची असतील तर रोज एक आलिंगन घेऊन एकमेकांबद्दलचं प्रेम आणि काळजी दर्शवा.

८. डोकेदुखीचा त्रास राहत नाही

तुम्हाला दीर्घकाळ स्वस्थ व निरोगी राहायचं असेल तर रोज आपल्या पार्टनरला आलिंगन द्या. आलिंगनामुळे आपण पाहिले की, रक्तदाब स्थिर राहतो, नैराश्य, ताण दूर पळतात. मग डोकेदुखी होण्यास तसेच इतरही काही आजार होण्यास कारणच उरत नाही.

९. स्मरणशक्ती वाढविते
संशोधनांती असं सांगितलं जातं की, नियमितपणे आलिंगनाचं सुख मिळवणाऱ्या दाम्पत्यांची स्मरणशक्ती दीर्घकाळापर्यंत चांगली राहते.

१०. आयुष्यही वाढते
रोजच्या रोज आलिंगन करणाऱ्या व्यक्ती अधिक आनंदी, उत्साही राहतात. नेहमी सकारात्मक विचार करतात ज्याचे त्यांना सकारात्मकच परिणाम मिळतात. ताण नाही, नैराश्य नाही, आजार नाही असं सगळं असताना आपोआपच आयुष्यही वाढतं.