रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाच्या सेटवरु...

रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाच्या सेटवरुन आलिया भट्टने दिल्या होळीच्या शुभेच्छा (‘Happy Holi From A Very Rangeeli Rani Reporting Straight From The Sets Of #rockyaurranikipremkahani’ Writes Alia Bhatt As She Wishes Fans On Holi, See Colourful Picture)

आलिया भट्ट आई झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच आपल्या कामावर परतली आहे. सोबतच ती आपल्या फिटनेसकडे सुद्धा खूप लक्ष देत आहे. त्यामुळेच अनेकज तिला कौतुकाने म्हणतात की ती स्वत: एका बाळासारखी दिसते, तिच्याकडे बघून ती आई आहे असे कोणीच म्हणार नाही.

कालच सर्वत्र होळी साजरी झाली. मात्र आलिया आपल्या कामात व्यस्त आहे, ती तिचा आगामी चित्रपट रॉकी आणि रानी की प्रेमकहानीचे शूटिंग करत आहे. आलियाने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर एक सुंदर आणि कलरफुल फोटो शेअर केला आणि आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या फोटोत आलियाने हिरवा आणि गडद गुलाबी रंगाचा टॉप घातला आहे आणि चेहऱ्यावर कमीत कमी मेकअप केला आहे. याशिवाय तिने रंगीबेरंगी छत्रीसुद्धा घेतलेली दिसत आहे. आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले – रंगिली राणीकडून होळीच्या शुभेच्छा, रॉकी और रानी की प्रेमकथाच्या सेटवरून थेट रिपोर्टिंग.

आलियाने यासोबत अनेक रंगीबेरंगी ह्रदयही पोस्ट केले आहेत. चाहत्यांना तिची शुभेच्छा देण्याची स्टाइल आवडली आहे.

चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर आलिया यात रणवीर सिंहसोबत दिसणार आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत असलेला हा चित्रपट २८ जुलैला प्रदर्शित होणार आहे.