शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा (Happy C...

शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा (Happy Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti)

महाराजांना मनाचा मुजरा…

३९५ किल्ले जिंकून एकाही किल्ल्यावर सत्यनारायणाची अथवा वास्तूशांतीची पुजा न घालणारे विज्ञानवादी राजे, बारा बलुतेदार आणि अठरापगड जातींना आपल्या स्वराज्यात स्थान देवून खऱ्या अर्थाने जातीनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष समाज-व्यवस्था निर्माण करणारे निधःर्मी राजे, आग्रा दरबारात शेवटच्या रांगेत उभे केले म्हणून बाणेदारपणे दरबार त्यागणारे स्वाभिमानी राजे, ज्यांच्या विचारांवर जगणारा माणूस आयुष्यात कधीच कुणाची गुलामगिरी करू शकत नाही असे, स्वराज्य निर्माते, बहुजनप्रतिपालक, कल्याणकारी राजे, कुळवाड़ीभुषण विश्ववंद्य जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंती निमित्त त्यांच्या कार्य-कर्तृत्वाला त्रिवार वंदन…! चला शिवरायांच्या धोरण, विचार-आचाराचे चिंतन-मनन आणि शक्य तो अनुपालन करू या…!

शिवजयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा