ऍक्टर डान्सर, सिंगर… ऑल राउंडर टायगर श्रॉ...

ऍक्टर डान्सर, सिंगर… ऑल राउंडर टायगर श्रॉफला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! (Happy Birthday To Tiger Shroff)

टायगर श्रॉफला आज आपला ३१वा वाढदिवस साजरा करत आहे. या दिवशी टायगरची आई आयेशाने आपल्या मुलाची प्रशंसा केली आहे, त्याला आशीर्वाद दिले आहेत आणि त्याचे छान छान फोटो शेअर करून टायगर श्रॉफला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. टायगर श्रॉफची ॲक्शन आणि डान्स तर उत्तम आहेच शिवाय तो अतिशय सुरात गातो. Unbelievable और Casanova या गाण्यांतून त्याने आपण गायकीही करू शकतो हे सिद्ध केले आहे. अशा या हॉट आणि फिटनेस किंग कलाकाराच्या बालपणापासून ते आत्तापर्यंतच्या गमतीजमती जाणून घेऊया.
टायगर श्रॉफचं खरं नाव जय हेमंत श्रॉफ असं आहे आणि कृष्णा ती त्याची लहान बहीण आहे.

निर्माता-दिग्दर्शक बिग शोमन सुभाष घई यांनी टायगरच्या जन्माच्या वेळेसच त्याच्या चित्रपटासाठी जॅकी श्रॉफला सायनिंग अमाउंट दिली होती. सगळ्यांना माहीत आहे की सुभाष घई यांचा जॅकी श्रॉफ यांच्या यशस्वी करिअरमध्ये महत्वाचा वाटा आहे. या दोघांनी एकत्र अनेक सुपर-डुपर हिट सिनेमे केले आहेत. सुभाष घई यांनी जर टायगर श्रॉफ सोबत एखादा सिनेमा केला तर तो देखील जबरदस्तच असेल यात काही शंका नाही.

टायगर श्रॉफ अकरा वर्षांचा असताना त्याच्या कुटुंबास अनेक चढ-उतार पाहावे लागले. २००३ साली टायगरची आई आयेशाने अमिताभ बच्चनसोबत ‘बूम’ हा सिनेमा बनवला, ज्यात कैतरिना कैफ देखील होती. हा त्यांचा पहिलाच सिनेमा होता. परंतु सिनेमा अजिबातच चालला नाही, आणि जॅकी श्रॉफला फार नुकसान सहन करावे लागले. जॅकी आणि आयेशा यांची या सिनेमामुळे आर्थिक परिस्थिती इतकी बिघडली की त्यांना बांद्रा येथील आपले राहते घर, फर्निचर, टायगरचा बेड असं सर्वच विकावं लागलं होतं. त्यानंतर कित्येक दिवस टायगर जमिनीवर झोपत होता.

२०१४ साली टायगर श्रॉफने दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला यांच्या ‘हिरोपंती’ या चित्रपटापासून आपल्या अभिनयास सुरुवात केली. या चित्रपटात त्यांच्यासोबत असलेली अभिनेत्री कृति सैनॉन हिचा देखील हिंदी चित्रपटसृष्टीतील हा पहिलाच चित्रपट होता. यापूर्वी तिने साऊथ चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

आपल्या पहिल्याच चित्रपटामध्ये टायगरने आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि ॲक्शनने सगळ्यांचे मन जिंकून घेतलं होतं. शिवाय त्याच्या उत्कृष्टतेसाठी त्याला मेल डेब्यूचे एक दोन नव्हे तर चार पुरस्कारही मिळाले होते.
टायगरचा डान्स, फाइट्‌स आणि मार्शल आर्ट्‌सने चाहत्यांना वेडं केलं आहे. बागी सीरिज, मुन्ना मायकल अशा सिनेमांमध्ये आपणांस त्याच्या कलागुणांचा प्रत्यय आलेला आहे.
टायगर श्रॉफला स्पोर्ट्स, मार्शल आर्ट्स आणि डांसची अतिशय आवड आहे आणि त्यामध्येच त्याला करिअर करायचं होतं. त्याला अभिनेता बनायचं नव्हतं.
टायगरने वयाच्या चौथ्या वर्षापासूनच मार्शल आर्ट शिकण्यास सुरुवात केली होती.
टायगर पॉप सिंगर मायकल जॅक्सनचा जबरदस्त फॅन आहे. म्हणून त्याच्या आई-वडिलांनी आयेशा-जॅकीने त्याला वाढदिवसाला मायकल जॅक्सनचे पेंटिगं भेट म्हणून दिलं होतं.
या पेंटिंगवर मायकल जॅक्सनने लिहिलेला संदेश आहे – ‘अच्छे लोगों को पढ़िए व महान बनिए…’ अर्थात चांगल्या लोकांचे अनुकरण करा नि यशस्वी व्हा. टायगर घरातून बाहेर पडण्यापूर्वी हा संदेश वाचायला विसरत नाही.

टायगर आणि श्रद्धा कपूर हे मुंबईत एकाच शाळेत शिकत होते. त्यामुळे त्या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. त्यांच्यातील जबरदस्त ट्यूनिंगमुळेच त्यांनी एकमेकांसोबत केलेले सिनेमे यशस्वी झाले आहेत.
खऱ्या आयुष्यात टायगर अतिशय लाजाळू आहे.
धूम ३ चित्रपटामध्ये आमिर खानला बॉडी बनविण्यासाठी टायगरने खूप मदत केली आहे, हे अतिशय कमी जणांना माहीत असेल.

गर्लफ्रेंड दिशा पाटनीसोबत त्याचे रोमँटिक पोजमधील अनेक फोटो सोशल मीडियावर पाहावयास मिळतात. दिशादेशील टायगरप्रमाणेच आपल्या फिटनेस, ॲक्शन आणि डान्सबाबत काळजी घेताना दिसते. ती अतिशय मेहनती आहे. काल रात्री दोघं बर्थ डे साजरा करण्यासाठीच एकत्र होते.
टायगरने आलिया भट्टसोबत ‘स्टूडंट ऑफ द ईयर 2’ मध्ये काम केलं. यात एका वेगळ्याच अंदाजात तो दिसला होता.
हृतिक रोशन त्याचं प्रेरणास्थान आहे आणि म्हणूनच हृतिक रोशनसोबर ‘वॉर’ चित्रपटात काम करायला टायगरला फार मजा आली. या चित्रपटात दोन्ही कलाकारांचे ॲक्शन सीन्स आणि डान्स अद्‌भूत आहेत.
आगामी गणपती, हिरोपंती २, बागी ४, रेम्बो या चित्रपटांत टायगर श्रॉफ आपल्याला एका वेगळ्या रुपात आणि विलक्षण अक्शनसोबत दिसणार आहे.

माझी सहेलीकडून टायगरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!