श्रद्धा कपूरला जन्मदिवसाच्या अनेक शुभेच्छा ! ति...

श्रद्धा कपूरला जन्मदिवसाच्या अनेक शुभेच्छा ! तिचे फोटोच सांगताहेत तिची गोष्ट… (Happy Birthday To Shraddha Kapoor, See Unseen Photos)

श्रद्धा कपूरचा आज ३४ वा वाढदिवस आहे. ती आज मालदीवला आपला वाढदिवस साजरा करत आहे. मावस भाऊ प्रियांक शर्मा म्हणजेच श्रद्धाची मावशी पद्मिनी कोल्हापुरेच्या मुलाच्या लग्नासाठी ती मालदीवला गेली आहे. चित्रपट निर्माते करीम मोरीनी यांची मुलगी शजा मोरीनीसोबत प्रियांक शर्माचं आज लग्न होत आहे. प्रियांकनेही २०१९ मध्ये ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटामध्ये काम केलं आहे. या चित्रपटामध्ये त्याची नायिका रीवा किशन ही अभिनेता रवि किशन यांची मुलगी असून तिचाही तो पहिलाच चित्रपट होता. लग्नसमारंभाच्या निमित्ताने श्रद्धाचं संपूर्ण कुटुंब मालदिवला एकत्र आलेलं आहे. लग्नातील मौजमजेसह आपल्या सगळ्या कुटुंबियांसोबत श्रद्धा आपला वाढदिवस साजरा करत आहे.

प्रियांक आणि शजा यांची हळद आणि इतरही लग्नातील रितींचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. मावशीच्या मुलाचं लग्न आहे म्हटल्यावर श्रद्धा लग्नातील प्रत्येक प्रसंगात भाग घेऊन त्याचा आनंद घेत आहे. तिचा बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठा हा देखील तिचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तेथे उपस्थित आहे. श्रद्धा आणि रोहन यांच्यातील प्रेमाला घरच्यांकडून परवानगी मिळाली आहे, तेव्हा लवकरच दोघं लग्नही करतील. रोहन हा श्रद्धाचा बालपणीचा मित्र आहे आणि सध्या बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध फोटोग्राफर आहे. २०१८ सालापासून त्यांच्यातील प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू आहे.

लग्नासाठी श्रद्धाचं अगदी योग्य वय आहे, तिने आता लग्न करायला हवं, असं श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांचं म्हणणं आहे. रोहन आणि श्रद्धा एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. रोहन एक चांगला मुलगा आहे. तेव्हा तिने तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न केलं तर आम्हाला आवडेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. म्हणजेच श्रद्धा आणि रोहन यांच्या लग्नाला घरातून हिरवा सिग्नल मिळालेला आहे. काहीच दिवसात त्यांच्याही घरी सनईचौघडे वाजतील…

श्रद्धाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती समुद्रकिनारी स्काय ब्लू रंगाचा लेहंगा घालून आहे. या लेहंग्यामध्ये ती गजबची सुंदर दिसत आहे. केस मोकळे सोडून तिने आपले लूक पूर्ण केले आहे. गळ्यात चोकर नेकलेस घातला आहे. श्रद्धा प्रतिभाशाली असली तरी स्वभावाने लाजाळू आहे. तिच्या खाजगी आणि फिल्मी जीवनावर नजर टाकूया.
श्रद्धा कपूरची आई मराठी असून तिचे वडील शक्ती कपूर पंजाबी आहेत. मुंबईतील जमुनाबाई शाळेमध्ये श्रद्धाचे शालेय शिक्षण झाले आहे. अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे येथे शिक्षणाबरोबरच ती फुटबॉल आणि हँडबॉलही खेळायची. बॉस्टनमध्ये श्रद्धाने आपलं पुढील शिक्षण घेतलं, परंतु अभिनयक्षेत्रात आल्यामुळे तिला आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. फेसबुकवर श्रद्धाला पाहिल्यानंतर फिल्म निर्माता अंबिका हिन्दुजा यांनी तिची आपल्या तीन पत्ती या चित्रपटासाठी निवड केली. श्रद्धाला लहानपणापासून पेंटिंग, स्केचिंग व गार्डनिंगचा छंद आहे. ती शाळेत असताना कविताही लिहायची. वरुण धवन हा श्रद्धाचा बालपणीचा मित्र आहे आणि आजही तो श्रद्धाला लाडाने चिरकुट अशी हाक मारतो.

ती उत्तम डान्सर आणि गायिकाही आहे.
श्रद्धाचं लता मंगेशकर यांच्याशीही जवळचं नातं आहे. श्रद्धाची आई शिवांगी ही लताजींची भाची आहे. सुप्रसिद्ध संगीतज्ज्ञ कृष्णाराव कोल्हापुरे यांचा मुलगा पंढरीनाथ कोल्हापुरे हे श्रद्धाचे आजोबा आहेत. पंढरीनाथ यांची आई दीनानाथ मंगेशकर यांची सावत्र बहीण आणि लता मंगेशकर, आशा भोसले, मीना, उषा आणि हृदयनाथ मंगेशकर यांची आत्या होती. श्रद्धा खूप छान गाते. एक व्हिलेन, बागी, रॉक ऑन २ आणि हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटांतील तिची गाणी लोकांना अतिशय आवडली.

लहनापणापासून तिला संगीताबद्दलचे चांगले ज्ञान आहे. ‘एक व्हिलेन’ चित्रपटातील ‘तेरी गलियां’ हे गाणं श्रद्धानं गायलं असून लोकांच्याही विशेष पसंतीस आलेले आहे.
लहानपणी तिचे वडील शक्ती कपूर शूटिंगवरून वेगवेगळ्या गेटअपमध्ये घरी आले की त्यांना पाहून ती बुचकाळ्यात पडायची.
आपल्या वडिलांकडे काहीतरी जादू आहे त्यामुळेच ते चित्रपटात वेगळे आणि घरी वेगळे दिसतात, अशी लहानग्या श्रद्धाची समजूत होती.

शक्ती कपूर चित्रपटांतून व्हिलनचा रोल करत असल्यामुळे श्रद्धाच्या मैत्रिणी तिच्या पप्पांना वाईट माणूस समजायच्या आणि त्यांना घाबरायच्या.
शक्ति कपूरवर जेव्हा कास्टिंग काऊचचा आरोप केला गेला तेव्हा श्रद्धा खूप घाबरली होती, तेव्हा ती तणावातून जात होती. पण शिवांगी, तिच्या आईने तिची समजूत काढली. त्यानंतर तिला तो प्रसंग सहन करण्याची शक्ती मिळाली. मीडिया एखादी गोष्ट कशी वाढवून-चढवून सांगते, दाखवते नि लिहिते हे देखील तिला समजले.  
श्रद्धा कपूर पहिलीत असताना, तिला तिच्या वर्गातील एक मुलगा आवडत होता.
विजांच्या कडकडाटाला ती खूप घाबरते.
श्रद्धाला वेस्टर्न सोबत इंडियन आणि पारंपरिक ड्रेस घालावयास आवडतात. ती बहुतेकदा लेहंगा, पंजाबी सूट वा इंडो-वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसते.

लाजाळू स्वभावामुळे तिला पार्ट्यांमध्ये मिक्सअप होण्यास कठीण जातं, त्यामुळे ती अतिशय कमी वेळा पार्ट्यांमध्ये जाते.
तिने आपल्या करिअरची सुरुवात ‘तीन पत्ती’ या चित्रपटाने केली. यात तिच्यासोबत अमिताभ बच्चन, बेन किंग्सले, आर. माधवन यांसारखे कलाकार होते.
त्यानंतर तिने लव का द एंड, आशिकी २, गोरी तेरे प्यार में, एक व्हिलेन, हैदर, उंगली, एबीसीडी २, बागी २, द फ्लाइंग जट, रॉक ऑन २, ओके जानू, हाफ गर्लफ्रेंड, हसीना पार्कर, नवाबजादे, स्त्री, बत्ती गुल मीटर चालू, साहो, छिछोरे, स्ट्रीट डांसर, बागी ३ इत्यादी एकाहून एक सरस चित्रपटांत काम केले आहे.

परंतु ‘आशिकी २’ या चित्रपटामध्ये तिला खऱ्या अर्थाने यश मिळालं. या व्यतिरिक्त ‘एबीसीडी २’ या चित्रपटात वरुण धवनसोबत तिची जोडी हिट ठरली. या चित्रपटातील श्रद्धाचा डान्स आणि हुशारी दोहोंचीही खूप प्रशंसा झाली.
चित्रपटसृष्टीतील श्रद्धाच्या यशामध्ये दिग्दर्शक मोहित सूरी यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्यासोबत श्रद्धाने आशिकी २, एक व्हिलेन, हाफ गर्लफ्रेंड हे तीन यशस्वी चित्रपट केले.
लव रंजन दिग्दर्शित आगामी चित्रपटामध्ये श्रद्धा रणबीर कपूरसोबत दिसणार आहे.
श्रद्धा कपूरला माझी सहेलीकडून जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
पाहा श्रद्धाच्या दिलखेच अदा, लग्नातील मस्ती आणि बालपणीचे फोटो…

Photo Courtesy: Instagram