आलिया भट्टचा आज वाढदिवस; पाहा तिचे बालपणीचे दुर...

आलिया भट्टचा आज वाढदिवस; पाहा तिचे बालपणीचे दुर्मिळ फोटो (Happy Birthday To Alia Bhatt, See Unseen Photos)

आलिया भट्ट आज आपला वाढदिवस साजरा करते आहे. ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ या चित्रपटापासून तिचे फिल्मी करिअर सुरू झाले. त्यापासून ते ‘गली बॉय’ पर्यंत अगदी कमी कालावधीत आलियाने आपल्या सुरेख अभिनयाने रसिकांच्या मनात स्थान मिळविले. ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘आर आर आर’ हे तिचे आगामी चित्रपट. ‘आर…’या चित्रपटाच्या संदर्भात ती बरीच चर्चेत आहे. कालच तिने या चित्रपटातील वेगळे लूक असलेला फोटो शेअर केला आहे.

आलियाच्या वाढदिवसानिमित्त करण जोहरने काल रात्रीच एक शानदार पार्टी दिली. त्यामध्ये चित्रपटसृष्टीतील सितारे सामील झाले. याप्रसंगी आलियाने छानसा काळा ड्रेस घातला होता. त्यात तिचे सौंदर्य खुलून दिसले. पार्टीत सगळी बडी धेंडे आली, पण आलिशाचा बॉयफ्रेंड रणबीर येऊ शकला नाही. करोना झाल्याने तो घरातच विलगीकरणात आहे.

आलियाच्या वाढदिवसानिमित्त कालच्या पार्टीचे तसेच तिच्या बालपणीचे काही दुर्मिळ फोटो पाहूया. आलियाच्या सोशल मीडिया अकाउंटवर असलेल्या या फोटोत तिचे पिता महेश भट्ट, आई सोनी राझदान, बहीण शाहीन, सर्व मित्र, रणबीर, अयान मुकर्जी दिसत आहेत. फोंटोबरोबरच तिच्या जीवनातल्या रंजक गोष्टी बघूयात.

‘स्टुडंट ऑफ द ईयर’ हा जरी तिचा पहिला चित्रपट असला तरी त्याआधी १९९९ साली अक्षयकुमार व प्रीति झिंटा यांच्या ‘संघर्ष’ चित्रपटात आलियाने बालकलाकार म्हणून काम केलं आहे. प्रीतिच्या बालपणीची भूमिका तिने केली होती.
आलिया ३ वर्षांची असताना तिला जुगल हंसराजचे खूप आकर्षण वाटले होते. ‘पापा कहते है’ या महेश भट्ट यांच्या चित्रपटात जुगल काम करत होता. जुगल त्यांच्या घरी एकदा आला तर त्याला बघून आलिया लाजली, अन्‌ पडद्यामागे लपली. आलियाचा जन्म ब्रिटनमध्ये झाला असून तिला ब्रिटीश नागरिकत्व मिळाले आहे.
आलियाला प्राण्यांबद्दल फार प्रेम आहे. कुत्रा-मांजरे तिला खूप आवडतात. शीबा नावाची मांजर तिने पाळली होती. तिच्यासह घेतलेले फोटो ती सोशल मीडियावर टाकत असे. आलियाला खायला आवडते. बटाटे तिचे खूप आवडते आहेत. म्हणून तिचे टोपण नाव ‘आलू’ असे आहे.
आलिया ११ वर्षांची होती, तेव्हा ‘ब्लॅक’ या चित्रपटाच्या सेटवर रणबीर कपूरला पाहून ती त्याच्यावर फिदा झाली होती. तेव्हा रणबीर, संजय लीला भन्साली यांचा सहाय्यक दिग्दर्शक होता.
दीपिका पदुकोण व कॅतरिना कैफ या रणबीरच्या आधीच्या गर्लफ्रेंडस्‌ आहेत. त्यांच्याशी आलियाचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

आलिया-रणबीरची जोडी सगळ्यांची आवडती आहे. दोघे लवकरच लग्न करणार आहेत.

कंगनाचे भयंकर वादग्रस्त ट्वीट : म्हणते – टॉयलेट स्वच्छ केले नाही तर गांधीजी आपल्या पत्नीला घराबाहेर काढत