बर्थडे विशेष : अनिल कपूरने सोनम कपूरचे बालपणीचे...

बर्थडे विशेष : अनिल कपूरने सोनम कपूरचे बालपणीचे फोटो शेअर करून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (Happy Birthday Sonam Kapoor: Anil Kapoor Wishes Daughter Sonam Kapoor Ahuja On Her Birthday, Shares Her Childhood Pictures)

बॉलिवूडची स्टाईल दिवा सोनम कपूरचा आज ३६वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवशी अनिल कपूरने आपल्या लेकीचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सोनमला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूडची फॅशन आयकन सोनम कपूरच्या वाढदिवशी अनिल कपूर यांनी तिचे बालपणीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोनम कपूर या फोटोंत अतिशय क्यूट दिसत आहे आणि तिच्या कुटुंबासोबतच तिचे चाहते देखील या पोस्टवर सोनम कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवत आहेत.

इन्स्टाग्रामवरील सोनमच्या बालपणीचे हे फोटो पाहिल्यानंतर, अनिल कपूरचे आपल्या मुलीवर किती प्रेम आहे आणि त्याला तिची किती आठवण येते हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही.

अनिल कपूरने इंस्टाग्राम वर सोनम कपूरच्या बालपणीचे फोटो शेअर करत आपल्या मुलीसाठी भावुक मेसेज देखील लिहिला आहे. – अनिल कपूरने लिहिलंय, ”नेहमी आपल्या स्वप्नांच्या मागे धावणारी आणि स्वतःच्या मनाचं ऐकणारी मुलगी सोनम कपूर! आई-वडिल म्हणून तुला दर दिवशी मोठं होताना पाहणं हे स्वप्न सत्यात उतरण्यासारखंच होतं. मला नशीबाने खूप छान मुलं मिळाली आहेत. तू मजबूत आहेस, जे तू असायलाच पाहिजे. न झुकता, दयाळू बन आणि पुढे जा.” मुलीबरोबरच अनिल कपूरने आपल्या जावयाचीही आठवण काढली आणि लिहिलं – ”आपल्याकडे असलेल्या गोष्टीत दुसऱ्यांना सामिल करून घेण्याची खूबी जी तुझ्यात आहे, ती मला आवडते. सोनम आणि आनंद तुम्ही सुरक्षित आणि निरोगी आहात, यासाठी मी तुमचा आभारी आहे. तुझ्याशिवाय आम्हाला करमत नाही. सोनम बेटा वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझी खूप आठवण येत आहे.”

तुम्हीही पाहा सोनम कपूरचे बालपणीचे क्यूट फोटो

अनिल कपूरच्या या पोस्टवर कमेंट करताना सोनमने लिहिलं, ‘लव यू डॅडी, मी तुम्हाला सगळ्यात जास्त मिस करते.’

याआधीही अनिल कपूरने इन्स्टाग्रामवर आपल्या तिन्ही मुलांचे फोटो शेअर केले आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम (सर्व फोटो)