गायिका श्रेया घोषालचा वाढदिवस : जाणून घेऊया तिच...

गायिका श्रेया घोषालचा वाढदिवस : जाणून घेऊया तिची यशोगाथा (Happy Birthday Shreya Ghoshal: Unknown & Interesting Facts About One Of The Most Melodious Singer)

सुरेल आवाजाची सुंदर दिसणारी गायिका श्रेया घोषाल आज आपला ३७ वा वाढदिवस साजरा करते आहे. अलीकडेच तिनं आपण आई होणार असल्याचे जाहीर केले होते. लग्नानंतर ६ वर्षांनी ती जन्मदात्री होणार आहे. तिच्याविषयी आणखी माहिती जाणून घेऊया.

फक्त ४ वर्षांची असताना श्रेयाने गायला सुरुवात केली. सारेगामापा या रिॲलिटी शोमध्ये ती स्पर्धक म्हणून गाजली. ती कार्यक्रमाची विजेती ठरली. तेव्हा संजय लीला भन्सालीच्या आईने हा कार्यक्रम पाहून संजयला तिच्याकडून पार्श्वगायन करण्याचा सल्ला दिला होता. आईचे ऐकून आपल्या ‘देवदास’ या चित्रपटासाठी संजयने तिचा आवाज ऐश्वर्या रायवर चित्रित होणाऱ्या गाण्यासाठी वापरला. तेव्हा श्रेया फक्त १६ वर्षांची होती. २६ व्या वर्षी तिला राष्ट्रीय पुरस्काराचा मान लाभला होता. एवढ्या कमी वयात हा सन्मान मिळविणारी ती पहिलीच भारतीय गायिका आहे.

संगीतसृष्टीत मोठे योगदान दिल्याबद्दल अमेरिकेतील ओहयोमध्ये २६ जून हा दिवस ‘श्रेया घोषाल डे’ म्हणून साजरा केला जातो. तसं पाहिलं तर श्रेया बंगाली आहे. पण तिने बंगाली व हिंदी बरोबरच तामीळ, तेलगु, कन्नड, मराठी व भोजपुरी भाषेत गाणी गायली आहेत. शिलादित्य मुखोपाध्याय या आपल्या बालपणीच्या मित्राशी तिनं २०१५ साली लग्न केले. बंगाली रितीरिवाजात हे लग्न थाटात पार पडले होते. दोघेही एकमेकांशी १० वर्षांपासून डेटिंग करत होते.
आता श्रेया आई होणार आहे!
तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

१० लोकप्रिय टी.व्ही. तारकांचे सिक्रेट टॅटू