हॅपी बर्थ डे राधिका आपटे; अहो आश्चर्यम्; तिचा ल...

हॅपी बर्थ डे राधिका आपटे; अहो आश्चर्यम्; तिचा लग्नसंस्थेवर विश्वास नाही… (Happy Birthday Radhika Apte; She Does Not Believe In Institution Of Marriage)

आपल्या अतिशय बोल्ड आणि बिनधास्त वर्तनाबाबत प्रसिद्ध असलेली राधिका आपटे अभिनयातही चांगलीच प्रवीण आहे. आज तिचा वाढदिवस आहे, त्या निमित्त तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
राधिका आपटे आपल्या बेफाम, बोल्ड विधानांनी, पडद्यावरील हॉट दृश्यांनी चर्चेत राहिली आहे. तिने ब्रिटीश म्युझिशियन बेनेडिक्ट टेलर याच्याशी लग्न केलं आहे. तरीपण तिने असं विधान केलं होतं की, माझा लग्नसंस्थेवर विश्वास नाही.

Radhika Apte Birthday

काही महिन्यांपूर्वी राधिका आपल्या नवऱ्याबरोबर लंडनला राहत असताना तिने अभिनेता व्हिक्टर मॅसी याच्या सोबत व्हिडिओ चॅट केलं, त्यामध्ये तिने हे वादग्रस्त विधान केलं होतं.
झालं असं की, विक्रांतने राधिकाला लग्नाबद्दल प्रश्न केला, तेव्हा हसत हसत ती उत्तरली, “लग्न केल्याने परदेशी जाण्याचा व्हिसा सहजपणे मिळतो, हे लक्षात आलं, म्हणून मी लग्न केलं. मी लग्नाची समर्थक नाहिये. लग्नसंस्थेवर देखील माझा विश्वास नाही.”

Radhika Apte Birthday

राधिकाने बेनेडिक्टशी २०१२ साली लग्न केलं. लग्नाआधी बराच काळ ते रिलेशनशिपमध्ये होते.

Radhika Apte Birthday

राधिका लंडनमध्ये कंटेम्पररी डान्स शिकायला गेली होती, तेव्हा तिची बेनेडिक्टशी भेट झाली. एक वर्ष डेटिंग केल्यावर त्यांनी गुपचूप लंडनमध्येच रजिस्टर्ड लग्न केलं. अन्‌ वर्षभराने तिने आपलं लग्न जाहीर केलं.

Radhika Apte Birthday
Radhika Apte Birthday
Radhika Apte Birthday

शोर इन द सिटी, अंधाधुन, पॅडमॅन या चित्रपटांमधून व लस्ट स्टोरीज्‌, सेक्रेड गेम्स, घोल, अशा वेब सिरिजमधून राधिकाने भूमिका केल्या आहेत. आपल्या बेफाम विधानांनी राधिका चर्चेत असते. तसेच आपल्या बिनधास्त, मनमोकळ्या जीवनशैलीने पण ती चर्चेत राहते.