हॅपी बर्थडे मनोज बाजपेयी (H...

हॅपी बर्थडे मनोज बाजपेयी (Happy Birthday Manoj Bajpeyee)

आज सुप्रसिद्ध अभिनेता मनोज बाजपेयीचा वाढदिवस आहे. बिहार राज्यातील बेलवा या छोट्याशा गावात मनोजचा जन्म २३ एप्रिल १९६९ रोजी झाला. त्याचा अभिनय, दमदार आवाज आणि प्रभावी संवादफेक याच्या जोरावर तो बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता गणला जात आहे. अलिकडेच तो ‘अय्यारी’ आणि ‘बागी २’ या चित्रपटांमधून चमकला होता. ‘बागी २’ मधील संयत आणि क्रूरकर्मा खलनायक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या प्रथितयश नाट्यशिक्षण संस्थेत तीन वेळा प्रयत्न करूनही मनोजला प्रवेश मिळाला नव्हता. पण त्याने खचून न जाता मनोजने ड्रामा स्कूल मधून बॅरी जॉन सोबत नाटकात काम करायला सुरुवात केली. ‘स्वाभिमान’ या टी. व्ही. मालिकेतून त्याच्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात झाली. नंतर ‘बॅन्डिट क्वीन’ या खळबळजनक कथावस्तू असलेल्या चित्रपटातून मनोजने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण ‘सत्या’ या राम गोपाल वर्मांच्या चित्रपटातील भिकू म्हात्रे या पात्राने मनोजला लोकप्रियता मिळाली. त्याच्या अभिनयाची वाहव्वा झाली. ते यश आजवर टिकून आहे. सत्या आणि पिंजर या चित्रपटातील भूमिकांबद्दल मनोजला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

‘माझी सहेली’ कडून मनोज बाजपेयीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!