हॅपी बर्थडे : रोमॅण्टिंक हिरो ते बाजीराव…...

हॅपी बर्थडे : रोमॅण्टिंक हिरो ते बाजीराव… (Happy Birthday: From Romantic Hero to Bajirao …)

बॉलिवूडचा बाजीराव अर्थात मोस्ट एनर्जेटिक हिरो रणवीर सिंगचा आज वाढदिवस आहे. रणवीर सिंग आज त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. रणवीर सध्या बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. बॉलिवूडच्या या बाजीरावाच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्याच्याबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग लहानपणापासूनच मस्तीखोर आहे. आपल्या अनोख्या स्टाईलने तो नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो.

‘इंडियाना यूनिवर्सिटी’ ब्लूमिंगटन येथे बॅचलर ऑफ आर्ट्सची डिग्री घेतल्यानंतर रणवीरनं अभिनेता होण्यासाठी मुंबई गाठली. २०१०मध्ये ‘बॅंड बाजा बारात’ या हिंदी चित्रपटातून रणवीरची बॉलिवूडमध्ये जोरदार एन्ट्री झाली.

बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात करण्यापूर्वी त्याने एका प्रसिद्ध जाहिरात कंपनीत कॉपी- रायटरची नोकरीसुद्धा केली होती.

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भावनानी आहे. तो अभिनेत्री सोनम कपूरची आई सुनीता कपूरच्या बहिणीचा मुलगा आहे.

रणवीर सिंग बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी म्हणजे 16 वर्षांचा असताना खूप जाडा होता. त्यानंतर त्याने फिटनेसकडे लक्ष दिले. सध्या बॉलिवूडच्या फिट अभिनेत्यांमध्ये रणवीरचे नाव घेतले जाते.

दमदार अभिनय आणि अफलातून डान्सरसोबतच रणवीर उत्तम रॅपरही आहे.

आपल्या अनोख्या फॅशन सेन्स व्यतिरिक्त अनेक गोष्टींमुळे रणवीर सिंग नेहमी चर्चेत असतो.

बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांमध्ये रणवीर सिंगचे नाव घेतले जाते. रणवीरने आपल्या अनोख्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

रणवीरने २०१८मध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत इटलीमध्ये लग्नगाठ बांधली.

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे बॉलिवूडमधील सर्वात रोमॅन्टिक कपल्सपैकी एक आहेत. दीपवीर ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी असून दोघांमध्ये केमिस्ट्रीदेखील पाहायला मिळते.

रणवीर सिंहने आजवर रोमॅण्टिंक हिरो ते बाजीराव सारख्या ऐतिहासिक भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘रामलीला’, ‘गली बॉय’, ‘सिम्बा’ असे सुपरहिट आणि दर्जेदार चित्रपट देऊन अत्यंत कमी कालावधीत रणवीर चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला आहे. 

रणवीर लवकरच ’83’ या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटात रणवीर कपिल देव यांच्या भूमिकेत तर दीपिका पादुकोण रोमी भाटिया यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

रणवीर सिंगला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

(सर्व फोटो सौजन्य : रणवीर सिंग / इन्स्टाग्राम)