हॅपी बर्थडे आयिशा टाकिया : ‘वॉन्टेड’...

हॅपी बर्थडे आयिशा टाकिया : ‘वॉन्टेड’ ची नायिका आहे तरी कुठे? (Happy Birthday Ayesha Takia: Where Is The ‘Wanted’ Actress Now? Ayesha Takia New Look Will Shock You)

सलमान खानच्या ‘वॉन्टेड’ या चित्रपटातून नावारुपास आलेली आयशा टाकियाचा आज वाढदिवस आहे. ही मुलगी चित्रपटांपेक्षा तिच्यावर झालेल्या कॉस्मेटीक सर्जरींवरून जास्त चर्चेत असते. तिने टारझन : द वंडर कार, सोचा न था, शादी नंबर १, डोर अशा चित्रपटांतून कामे केली.

काही दिवसांपूर्वी तिने केलेल्या लिप सर्जरीवरुन ती चर्चेत आली. मिळालेल्या माहितीनुसार, या आधी तिने ब्रेस्ट सर्जरी पण केली होती. शिवाय आपले लूक बदलण्यासाठी नोज सर्जरीसुद्धा तिने केली होती. मात्र ब्रेस्ट सर्जरी केल्याचा आयशाने साफ इन्कार केला होता.

सलमान खानच्या ‘वॉन्टेड’ सहित अन्य चित्रपटात भूमिका केलेल्या आयशाने फरहान आझमीशी लग्न केले. त्यासाठी तिने इस्लाम धर्म स्वीकारला. आता त्यांना मिकैल आझमी हा मुलगा आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयशाचे वडील हिंदू होते नि आई अँग्लो – इंडियन होती. फरहान आझमीशी लग्न करण्यासाठी तिने धर्मांतर केले. मात्र या विषयावर आयशाने कधी वक्तव्य केले नाही.

फरहान आझमी हॉटेल मालक आहे. राजकारणी अबू आझमी यांचा तो मुलगा आहे. एका मुलाची आई झालेली आयशा चांगले जीवन जगते आहे. वन्य जीवनास पाठिंबा देत आहे.

आयशाचा सुंदर चेहरा व सुहास्य विसरता येत नाही. तरी पण ओठांना आकार देण्यासाठी तिने सर्जरी केली, अन्‌ तिचे रुपच पालटले. आधीचा सुंदर चेहरा बदलला.

काही दिवसांपूर्वी आयशाने ओठ आणि नाकावर सर्जरी करून घेतली. तेव्हा तिचा चेहरा इतका बदलला की, हीच ती सुंदर चेहऱ्याची आयशा आहे यावर विश्वास बसत नाही. आयशाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. अन्‌ लोकांनी चांगलेच ट्रोल केले.