हॅपी बर्थ डे आशा पारेख… ती आजन्म अविवाहित...

हॅपी बर्थ डे आशा पारेख… ती आजन्म अविवाहित का राहिली? जाणून घेऊया हे रहस्य…(Happy Birthday Asha Parekh : Why She Never Got Married?)

Happy Birthday Asha Parekh, Never Got Married

जुन्या जमान्यातील गाजलेली अभिनेत्री आशा पारेख ही आज ७९ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. अभिनयाबरोबरच ती नृत्य करण्यात अतिशय प्रवीण होती. तिने सर्वच टॉप कलाकारांबरोबर नायिकेच्या भूमिका साकार केल्या. परंतु तिच्या जीवनाचं एक रहस्य आहे… ती आजन्म अविवाहित राहिली…

तरुण वयात आशा पारेख ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडली होती त्याच्याशी तिनं लग्नाचा घाट घातला नाही. कारण आपल्या कुटुंबियांवर तिचं इतकं प्रेम होतं की, त्यांच्यापासून दूर होण्याची कल्पना तिला सहन होत नव्हती… म्हणून तिनं लग्न केलं नाही…

Happy Birthday Asha Parekh, Never Got Married

आशा पारेखची चित्रपट कारकीर्द खूपच रोचक आहे. ‘माँ’ या चित्रपटातून ती बाल कलाकार म्हणून आली. अन्‌ पुढे घुंघट, मेरी सुरत तेरी आंखे, जब प्यार किसीसे होता है, तिसरी मंझील, आये दिन बहार के, बहारों की मंझील, कटी पतंग, आन मिलो सजना, कारवां अशा एकाहून अशा एकाहून एक रौप्यमहोत्सवी चित्रपटांतून गाजली. तिच्यावर चित्रित झालेली एकाहून एक सरस गाणी, आजही सिनेरसिकांच्या तोंडी घोळतात.

आमिर खानचे काका निर्माते-दिग्दर्शक नासिर हुसेन यांच्याशी असलेल्या तिच्या नातेसंबंधांच्या खूप चर्चा एके काळी रंगल्या होत्या. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची ती नायिका होती.

Happy Birthday Asha Parekh, Never Got Married

आशा पारेखला लाईफ टाईम अचिव्हमेन्ट ॲवॉर्ड आणि पद्मश्री देण्यात आलेली आहे. केन्द्रीय सेन्सॉर बोर्डाची अध्यक्ष म्हणून पण तिने काम पाहिले आहे. वहिदा रेहमान आणि हेलन या तिच्या जिवलग मैत्रिणी आहेत. ‘द हिट गर्ल’ नावाचे आत्मचरित्र तिनं लिहिलं आहे.