अनन्या पांडेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिचं प...

अनन्या पांडेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिचं प्रेम, आवडनिवड (Happy Birthday Ananya Pandey : Her Crush, Likings And Lifestyle)

क्रूझ ड्रग पार्टीच्या निमित्ताने आर्यन खानशी असलेली मैत्री आणि चॅटच्या निमित्ताने तरुण अनन्या पांडे चौकशीच्या फेऱ्यात अडकली. अन्‌ चर्चेत आली आहे. आज तिचा वाढदिवस आहे.

स्टुडंट ऑफ द ईयर-२ या चित्रपटाने अनन्याची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. पती-पत्नी और वो आणि खाली पिली या चित्रपटातून पण ती चमकली.

अनन्याचा ड्रेस सेन्स जबरदस्त आहे. शॉर्ट स्कर्ट, मिनी ड्रेस, स्वीमिंग सुट, बिकिनी, ट्रॅडिशनल, वेस्टर्न अशा सर्वच प्रकारच्या ड्रेसमधील आपले फोटो ती सोशल मीडियावर प्रदर्शित करत असते.

धीरूभाई अंबानी शाळेतून अनन्या शिकली. लॉस एंजल्स येथील विद्यापीठातून तिचं कॉलेज जीवन झालं.

एक-दोनच नव्हे तर, अनन्याचे बरेच पुरुष आवडते आहेत. एका मुलाखतीत तिनं सांगितलं होतं की, कार्तिक आर्यन आपल्याला खूप आवडतो. पडद्यावर गरमागरम दृश्य सादर करायचं झालं तर ते वरुण धवनसोबत करायला आवडेल. क्रिकेटवीर विराट कोहली तिला खूपच आवडतो.

फॅशन डिझायनर मोनिशा सिंहचा मुलगा करण याच्याशी अनन्या रिलेशनशिपमध्ये होती, असं बोललं जातं. पण आम्ही चांगले मित्र आहोत, असं तिनं जाहीर करून टाकलं.

अनन्याला पिझ्झा आणि चॉकलेटस्‌ खूप आवडतात. स्नेहलता पांडे, या आपल्या आजीशी अनन्याची खूप जवळीक होती. त्यांच्या निधनानंतर अनन्याने खूपच भावनिक संदेश लिहिला होता.

अनन्याला कुत्र्या-मांजराची खूप आवड आहे. तिला भ्रमंती खूप आवडते. परदेशात भटकंती करून ती फोटो शेअर करत असते. न्यूयॉर्क, लंडन आणि लास व्हेगास ही तिची आवडती शहरे आहेत.

आर्यन खान, त्याची बहीण सुहाना आणि संजय कपूरची मुलगी शनाया, हे तिचे बालमित्र आहेत.