धडाकेबाज अजय देवगणचा ५२ वा वाढदिवस (Happy Birth...

धडाकेबाज अजय देवगणचा ५२ वा वाढदिवस (Happy Birthday Ajay Devgn, Turns 52 This Year)

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
आपल्या अभिनयकौशल्याने अनेक भूमिका यशस्वी करणारा कलाकार अजय देवगन आज त्याचा ५२वा वाढदिवस साजरा करत आहे. अजय देवगणने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांतून एकापेक्षा एक अविस्मरणीय भूमिका साकारलेल्या आहेत. २ एप्रिल १९६९ मध्ये ॲक्शन डायरेक्टर वीरू देवगन यांच्या घरी अजयचा जन्म झाला. १९९१ मध्ये ‘फूल और कांटे’ या चित्रपटापासून त्याने चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. अजयचं खरं नाव विशाल देवगन आहे. आपलं फिल्मी करिअर सुरू करण्यापूर्वी त्यानं आपलं नाव बदलून अजय असं ठेवलं. आपल्या पहिल्या चित्रपटापासूनच त्याने या इंडस्ट्रीचा ताबा मिळविला. ‘फूल और कांटे’ या चित्रपटातील अजयच्या ग्रँड एंट्रीचा सीन आजही पहिल्यांदाच पाहावा असा पाहिला जातो.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
‘फूल और कांटे’ या चित्रपटासाठी अजय देवगनला बेस्ट न्यू कमरचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटानंतर अजयला कधीही मागं वळून पाहावं लागलं नाही. एका वेळेस अनेक चित्रपटांच्या शूटिंगमध्ये अजय व्यस्त राहायचा. सुहाग, दिलवाले, इश्क यासारखे अनेक यशस्वी चित्रपट त्याने केले. तसेच चित्रपटांतील दमदार अभिनयासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

अजय देवगनला ‘जख्म’ या चित्रपटासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर ‘द लेजेंड ऑफ भगत सिंह’ या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी अजयला दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतरही रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’ या चित्रपटात अजय देवगनने आपल्या जबरदस्त अभिनयाची प्रचिती करून दिली.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
चित्रपटातील अतिशय अवघड असे स्टंटदेखील अजय अगदी सहजतेने करतो. केवळ ॲक्शनच नाही तर विनोदी भूमिकाही तो यशस्वी करतो. गोलमाल मधील अजय देवगनची कॉमेडी कमालीची आहे. या व्यतिरिक्त अजय रोमँटिक चित्रपटातही तितकाच शोभून दिसतो.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
अभिनयासोबतच अजयने निर्माता-दिग्दर्शक म्हणूनही आपली ओळख बनवली आहे. त्याच्या होम प्रोडक्शनने अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. त्यापैकी ‘तानाजी – द अनसंग वारियर’ या चित्रपटानं सफलतेचा उच्चांक गाठला. या चित्रपटाच्या यशानं अजय देवगन एक उत्कृष्ट अभिनेताच नव्हे तर उत्कृष्ट निर्माता- दिग्दर्शक म्हणूनही नावारुपास आला आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम


आपल्या फिल्मी करिअरप्रमाणेच खाजगी आयुष्यातही अजय देवगन तितकाच यशस्वी ठरला आहे. स्वतःला प्रकाशझोतापासून दूर ठेवणारा अजय फुरसत मिळताच आपल्या कुटुंबियांसोबत राहणे पसंत करतो. ११९९ मध्ये अजयचे काजोलसोबत लग्न झाले. त्यांच्या वैवाहिक जीवनास २२ वर्षे झाली असून त्यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडी आहे. त्यांच्यातील नाते चाहत्यांसाठी आदर्शवत आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

बॉलिवूडचा धुरंधर आणि दिग्गज अभिनेता अजय देवगन आज आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत असताना चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांकडून त्यास अनेक शुभेच्छा दिल्या जात आहेत. संजय दत्तनेही अजयला जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, तर रितेश देशमुखने अजय देवगनचा फोटो शेअर करून त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

फोटो सौजन्य:इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

अजय देवगनच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं तर ‘आरआरआर’ या चित्रपटामध्ये त्याचा नवा लूक पाहावयास मिळणार आहे. तसेच संजय लीला भंसाली यांच्या ‘गंगूबाई काठियावाड़ी’ चित्रपटामध्ये अजय कॅमियो करताना दिसणार आहे. अजय देवगन लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘मेडे’ या चित्रपटातही दिसणार आहे. अजय देवगनचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. त्यात ‘भुज’ आणि ‘मैदान’ यांचंही नाव समाविष्ट आहे.

बॉलिवूडच्या या दिग्गज कलाकारास ‘माझी सहेली’ कडून वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!