सोन्याने मढा, निरोगी राहा (Gurupushyamrut, An A...

सोन्याने मढा, निरोगी राहा (Gurupushyamrut, An Auspicious Day Special : Health Benefits of Gold Jewellery)

भारतीय महिलांना सोन्याच्या दागिन्यांचे विशेष आकर्षण असते. त्या प्रत्येक दागिन्याशी भावनिकरित्या जोडल्या जातात आणि ते दीर्घकाळ वापरत राहतात. त्यांचे हे सोन्याचे वेड त्यांना निरोगी ठेवते. कसे ते जाणून घेऊया –
सोने हे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. सोने हा असा धातू आहे जो आंतरराष्ट्रीय व्यवहारात परकीय चलनासाठी वापरला जाऊ शकतो. भारतीय महिलांना सोन्याच्या दागिन्यांचे विशेष आकर्षण असते. सण-समारंभ, घरगुती कार्यक्रम असे कोणतेही निमित्त असो महिला सोन्याच्या दागिन्यांत मढलेल्या दिसतात. सोन्याचे झुमके असोत की नेकलेस, जडाऊ नेकलेस असो वा ब्रेसलेट, तिला वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये बनवलेले सोन्याचे दागिने घालायला आवडतात. स्त्रिया प्रत्येक दागिन्याशी भावनिकरित्या जोडल्या जातात आणि ते दीर्घकाळ वापरत राहतात. अनेक कुटुंबांमध्ये स्त्रिया पिढ्यान्पिढ्या वापरलेले दागिने त्यांच्या मुली, नातवंडे किंवा सुना यांना भेट देतात.

सोन्याचे आरोग्यवर्धक गुण
सोन्याचे दागिने घातल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात, हे अनेकांना माहिती नसते. या लेखात आम्ही सोन्याचे दागिने घालण्याचे तेच फायदे सांगत आहोत, तसेच कोणते दागिने कोणत्या भागात घातल्याने कोणत्या आरोग्याच्या समस्येपासून आराम मिळतो, हेही तुम्ही इथे वाचू शकता.

कानात सोन्याचे झुमके घातल्याने नैराश्य कमी होते
महिलांना कानात झुमके, रिंगा वा बटणासारखे वेगवेगळ्या डिझाइनचे कानातले घालण्याची आवड असते. पुरुष मंडळीसुद्धा फॅशन म्हणून कानात छोटी बाली घालताना दिसतात. कानात दागिने घातल्याने कानात संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. यासोबतच मानसिक आरोग्यही सुधारते. यामुळे नैराश्य आणि तणावाचा धोकाही कमी होतो.

अशक्तपणा दूर करून ताकद वाढवते
ज्या लोकांना थकवा, अशक्तपणा आणि अ‍ॅनिमियाच्या तक्रारी आहेत त्यांनी सोन्याचे दागिने घालावेत. यातून त्यांना फायदा होऊ शकतो. सोन्याचे दागिने परिधान केल्याने शरीरात ताकद वाढते आणि वजन वाढण्यास मदत होते.

हृदय निरोगी बनवते
सोन्याचे दागिने परिधान केल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा आणि उष्णता निर्माण होते. त्यामुळे सर्दी-पडसे, दम्याची लक्षणे, श्वसनाचे आजार, रक्तदाब यांसारख्या समस्या कमी होतात. तसेच हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो. रक्ताभिसरणही चांगले होते.