गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ! (Greetings ...

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ! (Greetings For The Holy Guru Pournima)

आज आषाढ शुद्ध पौर्णिमा! या पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. व्यासांनी वेदांचे चार भाग, सहा शास्त्रे, अठरा पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले. या सर्वांतून भगवंताचे गुणगान, त्यांचे यशगान करीत मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे. त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा हा मंगलदिन!

दत्तभक्तांसाठी हा पुण्यपावन दिवस असतो.

गुरुपौर्णिमेच्या या दिवशी शिष्य आपल्या गुरुची पंचोपचारे पूजा करतो. आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतो. मात्र गुरुकृपा होण्यासाठी गुरुंवर पूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे.

गुरुर्बम्हा गुरूर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।

गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः।।